Home /News /viral /

पूरपरिस्थितीमुळे नागरिक चिंतेत; स्टंटबाजी करीत माजी आमदार पोहोचले गावात, पाहा VIDEO

पूरपरिस्थितीमुळे नागरिक चिंतेत; स्टंटबाजी करीत माजी आमदार पोहोचले गावात, पाहा VIDEO

हा VIDEO व्हायरल होत असून अनेकांनी यावर राग व्यक्त केला आहे.

    लखनऊ, 13 ऑगस्ट : एकीकडे देशातील अनेक भागांमध्ये पावसाचं संकट ओढवलं आहे. अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातील जनपदमधील नागरिक पुरामुळे त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे पुराचं पाणी कोणासाठी मनोरंजन ठरत आहे. समाजवादी पार्टीचे माजी आमदार मनोज सिंह बबलू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माजी आमदार कारच्या बोनेटवर बसून स्टंट करीत असताना दिसत आहे. (Viral Video on Social Media) करोटा भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं. तर स्वत:ला शेतकऱ्यांचा हितचिंतक मानणाऱ्या माजी आमदारांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये माजी आमदार गाडीच्या बोनेटवर बसून पूरग्रस्त भागात गेले आहे. माजी आमदार मदतीचं साहित्य घेऊन तेथे पोहोचले आणि स्वत: ट्रकवर चढून लोकांना साहित्य वाटप केलं. सैय्यदराजा विधानसभेचे माजी सपा आमदार मनोज सिंह बबलू यांचा एक व्हिडीओ जिल्ह्यात व्हायरल होत आहे. ज्यात शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणवणारे माजी आमदार बोनेटवर बसून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आले. (Citizens concerned over floods former MLA reached the village doing stunts see VIDEO ) हे ही वाचा-VIDEO: एक प्रियकर आणि 2 प्रेयसी; प्रेमासाठी पहिलीने दुसरीला भरबाजारात लोळवलं यापूर्वीदेखील मनोज सिंह यांनी अल्लडपनमध्ये चर्चेत होते. स्वत:ला शेतकऱ्यांचा मुलगा म्हणवण्याची संधी ते कधीच सोडत नाहीत. 2012 मध्ये सैय्यदराजा विधानसभेला पूर्वांचलच्या हॉट सीटचं नाव मिळालं होतं. ज्याकडे संपूर्ण भागातील नागरिकांचं लक्ष लागून होतं. सैय्यदराजा विधानसभेमधून पूर्वांचलचे बाहुबली बृजेश सिंह यांच्याविरोधात सपाच्या जागेवरुन मनोज सिंह डबलू निवडणूक लढले होते. या निवडणुकीत बृजेश सिंह यांना शिकस्त दिल्यानंतर मनोज सिंह चर्चेत आले होते. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. हिमाचल प्रदेशात तर गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या असून यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. काही दिवसांपूर्वी एका पुरग्रस्त भागात मंत्रीसाहेब गेले होते व तेथेच ते अडकल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर बोलावण्यात आलं होतं. दरम्यान उत्तर प्रदेशातील माजी आमदाराच्या या स्टंटबाजीवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rain flood, Uttar pradesh news

    पुढील बातम्या