Home /News /viral /

Chris Gayle Music Song: IPL स्पर्धेत 'युनिव्हर्स बॉस'च्या गाण्याची धमाल, पाहा Video

Chris Gayle Music Song: IPL स्पर्धेत 'युनिव्हर्स बॉस'च्या गाण्याची धमाल, पाहा Video

ख्रिस गेल (Chris Gayle) सध्या आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) भारतात आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचा सदस्य असलेला गेल हा सध्या त्याच्या बॅटींगमुळे नाही तर दुसऱ्या एका कारणासाठी चर्चेत आहे.

  मुंबई, 12 एप्रिल: टी 20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक बॅट्समन म्हणून ख्रिस गेल (Chris Gayle) ओळखला जातो. वयाच्या 41 व्या वर्षी देखील ख्रिस गेलची मैदानात दहशत आहे. ख्रिस गेल सध्या आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) भारतात आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचा सदस्य असलेला गेल हा सध्या त्याच्या बॅटींगमुळे नाही तर दुसऱ्या एका कारणासाठी चर्चेत आहे. ख्रिस गेलचं 'जमेका टू इंडिया' (Jamaica to India) हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून ते सध्या चांगलंच व्हायरल (Viral) झालं आहे. ख्रिस गेलनं रॅपर एमीवे बंटाय (Emiway Bantai) सोबत हे गाणं केलं आहे. गेल मैदानाच्या बाहेर त्याच्या धमाल लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर तो सोशल मीडियावर (Social Media) देखील लोकप्रिय आहे. गेलनं यापूर्वी देखील अनेकदा मजेदार व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर केले आहेत. ख्रिस गेलचं हे गाणं हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहे. गेलनं इंग्रजीमध्ये तर एमीवेनं हिंदीमध्ये हे गाणं गायलं आहे. दोघांनी एकत्र हे गाणं सादर देखील केलं आहे. टोनी जेम्स यांनी याला संगीत दिलं आहे. गेलनं त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं असून आयपीएल स्पर्धेच्या पूर्वीच हे गाणं लोकप्रिय होत आहे.
  ख्रिस गेलच्या पंजाब किंग्जची पहिली मॅच सोमवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. गेलनं मागच्या आयपीएलमध्ये 288 रन काढले होते. यंदाही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आयपीएल इतिहासात सर्वात जास्त सिक्स लगावण्याचा रेकॉर्ड देखील गेलच्या नावावर आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Chris gayle, IPL 2021, Punjab kings, Social media viral, Song, Viral video on social media

  पुढील बातम्या