मराठी बातम्या /बातम्या /Viral /चॉकलेटचे दागिने, चॉकलेटची हेअरस्टाईल; असं चॉकलेट प्रेम कुठेच पाहिलं नसेल

चॉकलेटचे दागिने, चॉकलेटची हेअरस्टाईल; असं चॉकलेट प्रेम कुठेच पाहिलं नसेल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावं वाटत असतं. त्यासाठी ती कपड्यांपासून मेकअपपर्यंत बऱ्याच गोष्टी ट्राय करत असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 29 जानेवारी : प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावं वाटत असतं. त्यासाठी ती कपड्यांपासून मेकअपपर्यंत बऱ्याच गोष्टी ट्राय करत असते. आजकाल तर मेकअप आणि फॅशन या गोष्टी खूप चालतात. यावर लोक विविध प्रयोगही करताना दिसून येतात. सुंदर दिसण्यासाठी आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी मुली अनेक हटके स्टाईल करत फोटो व्हिडीओ काढतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लग्नाच्या पोशाखापासून ते हेअर स्टाइलपर्यंत, प्रत्येक गोष्टीत मुलीला परफेक्शन हवं असतं. नववधूंच्या मेकअपशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक तरुणीचा हटके लुक सोशल मीडियावर चर्चेत आलाय. व्हिडीओमधील मुलीची हेअरस्टाईल आणि दागिने पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल की अशीही स्टाईल असते.

हेही वाचा - ऐकावं ते नवल! खरं प्रेम शोधण्यासाठी मुलीने लढवली शक्कल; केलं असं काही बसणार नाही विश्वास

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मेकअप आर्टिस्टने वधूचे केस अशा प्रकारे सजवले आहेत की लोकही थक्क झाले आहेत. फुलांचा वापर साधारणपणे केसांच्या स्टाइलसाठी केला जातो. पण व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वधूच्या केसांची स्टाईल चॉकलेट आणि टॉफीने करण्यात आली आहे. हो.. तुम्ही बरोबर ऐकत आहात. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पाहा.

मेकअप आर्टिस्ट चित्राने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, ती किट कॅट, 5 स्टार, मिल्कीबार आणि फेरेरो रोचर सारख्या ब्रँडच्या चॉकलेटने वधूचे केस सजवताना दिसत आहे. अगदी मँगो बाइट टॉफीपासून झुमकेही बनवले आहेत. हारही कँडींनी सजवण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 71 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 2 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंटही पहायला मिळत आहे. अगदी काही कालावधीतच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसतोय. असं काही हटके आणि वेगळं करण्याचा यापूर्वीही अनेकांनी प्रयत्न केला आहे. त्यांचेही व्हिडीओ असे धुमाकूळ घालताना पहायला मिळाले.

First published:

Tags: Fashion, Social media, Social media viral, Top trending, Video viral