• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • व्हिडिओ बनवण्याच्या नादात ब्लॉगरने इतके पदार्थ खाल्ले की भडकला रेस्टॉरंटचा मालक, घेतला अजब निर्णय

व्हिडिओ बनवण्याच्या नादात ब्लॉगरने इतके पदार्थ खाल्ले की भडकला रेस्टॉरंटचा मालक, घेतला अजब निर्णय

सेंट्रल चीनच्या चांग्शा शहरात (Changsha city) राहणाऱ्या फूड लाईव्ह स्ट्रीमर मिस्टर कांगला तिथल्या रेस्टॉरंटने बॅन केलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : सोशल मीडियावर सध्या फूड ब्लॉगरच्या व्हिडिओला (Videos of Food Blogger) चांगलीच पसंती मिळताना दिसते. यात लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे पदार्थ खातात आणि याचे व्हिडिओ शेअर करतात. यादरम्यान हे ब्लॉगर्स रेस्टॉरंटमधील जेवणाची आणि लोकेशनची पब्लिसिटी (Publicity by Food Blogger) करतात. यामुळे रेस्टॉरंटचाही फायदा होतो. अशात बहुतेक रेस्टॉरंट या ब्लॉगर्सला मोफत जेवण देतात. मात्र एखाद्या ब्लॉगरने रेस्टॉरंटचा फायद्याच्या जागी तोटाच केला तर? अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. इथे एका फूड ब्लॉगरला रेस्टॉरंटने बॅन केलं आहे (Chinese Restaurant Bans Food Blogger). सेंट्रल चीनच्या चांग्शा शहरात (Changsha city) राहणाऱ्या फूड लाईव्ह स्ट्रीमर मिस्टर कांगला तिथल्या रेस्टॉरंटने बॅन केलं आहे. या व्यक्तीने तिथल्या हंदादी सिफूड BBQ बुफेमध्ये जाऊन फूड ब्लॉग बनवला. याठिकाणी टेस्टिंगच्या नावाखाली त्याने तिथली एक संपूर्ण फूड ट्रे संपवली. यानंतर त्याने या रेस्टॉरंटचं भरपूर कौतुक केलं. रेस्टॉरंटने या जेवणासाठी कांगकडून पैसे घेतले नाहीत. मात्र यानंतर दुसऱ्यांदा कांग तिथे गेला आणि त्याने ३० सोया मिल्कच्या बॉटल पिल्या. यानंतर रेस्टॉरंटने त्याला बॅन केलं. मिस्टर कांग यांनी या प्रकरणी रेस्टॉरंटवर आरोप करत म्हटलं की हे रेस्टॉरंट जास्त जेवण करणाऱ्यांसोबत भेदभाव करतं. त्याने सोशल मीडियावर असा सवाल केला, की जास्त खाणं ही त्याची चूक आहे का? तर रेस्टॉरंटच्या मालकाने आपली बाजू मांडत सांगितलं की हा व्यक्ती जेव्हा तिथे येतो तेव्हा तो अनेक हजारांचं जेवण फस्त करतो. हे प्रकरण चीनी सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. याला 250 मिलियनहून अधिकांनी पाहिलं आहे. या प्रकरणात काही लोक रेस्टॉरंटच्या मालकाचं कौतुक करत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की इतकं जेवण मोफत दिल्याने खरंच रेस्टॉरंटचं भरपूर नुकसान होत असेल. तर अनेकांचं असं म्हणणं आहे की रेस्टॉरंटला या ब्लॉगरमुळे भरपूर पसंती मिळाली आहे. त्यामुळे रेस्टॉरंटच्या मालकाने या व्यक्तीसोबत असं करायला नको होतं. मात्र या प्रकरणाने ब्लॉगर आणि रेस्टॉरंट दोघांनाही भरपूर पसंती मिळवून दिली.
  Published by:Kiran Pharate
  First published: