मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: 'ही तर चीनची लता मंगेशकर', चायनीज तरुणीनं गायलेलं 'आँखें खुली' गाणं ऐकून भारतीय फिदा

VIDEO: 'ही तर चीनची लता मंगेशकर', चायनीज तरुणीनं गायलेलं 'आँखें खुली' गाणं ऐकून भारतीय फिदा

या व्हिडिओमध्ये एका चायनिज मुलीनं चायनिज रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला (Chinese girl sings Aankhen Khuli song) आहे. या चक्क ती मोहब्बतें (Mohabbatein) सिनेमातील आँखें खुली हों (Aankhen Khuli) हे गाणं गात आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 29 मे : चीन आणि भारतात सध्या तणावपूर्ण संबंध असले तरी नुकताच समोर आलेला एक व्हिडिओ मन प्रसन्न करणारा आहे. भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत असते. केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेकांच्या हे सिनेमे पसंतीस पडतात. अशात बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) याचेही अनेक चाहते जगभरात आहेत. हे चाहते भाषेचा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आपल्या आवडत्या कलाकाराबाबतचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असतात.

असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. कावेरी नावाच्या एका ट्विटर यूजरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका चायनिज मुलीनं चायनिज रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला (Chinese girl sings Aankhen Khuli song) आहे. या चक्क ती मोहब्बतें (Mohabbatein) सिनेमातील आँखें खुली हों (Aankhen Khuli) हे गाणं गात आहे. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चनसारखी स्टारकास्ट असणाऱ्या या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. सिनेमातील गाणी आजही अनेकांच्या ओठी ऐकायला मिळतात.

चायनिज मुलीनं गायलेलं ही हिंदी गाणं ऐकून केवळ तिथले श्रोते आणि जजच नाही तर सर्वचजण आवाक झाले आहेत. हिंदी गाणं गात असूनही गाण्यातील शब्द, त्यांचा उच्चार आणि चाल हे सर्वकाही ती अत्यंत सुंदर पद्धतीनं मांडताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून याला नेटकऱ्यांची भलतीच पसंती मिळत आहे.

भारत आणि चीनमध्ये असलेल्या तवाणपूर्ण वातावरणादरम्यान या मनाला सुखावणाऱ्या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काही नेटकऱ्यांनी तर तिला चीनची लता मंगेशकर असं संबोधलं आहे. तर अनेकांनं तिच्या आत्मविश्वासाचं आणि आवाजाचं कौतुक केलं आहे.

First published:

Tags: India china, Song, Video viral