धक्कादायक! 13 वर्षीय मुलाच्या गुप्तांगातून ऑपरेशननंतर काढली 2 फूट लांब वायर

ड़ॉक्टरांनी नेमका काय प्रकार आहे हे तपासण्यासाठी त्याचे रिपोर्ट काढले आणि त्यांचा धक्कादायक रिपोर्ट समोर आले आहेत.

ड़ॉक्टरांनी नेमका काय प्रकार आहे हे तपासण्यासाठी त्याचे रिपोर्ट काढले आणि त्यांचा धक्कादायक रिपोर्ट समोर आले आहेत.

  • Share this:
    बिजिंग, 04 नोव्हेंबर : चीनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका मुलाच्या ब्लॅडरमधून 2 फूट लांब वायर ऑपरेशन करून बाहेर काढण्यात आली. जवळपास 3 महिने ही वायर त्याच्या ब्लॅडरमध्ये होती. 13 वर्षीय या मुलाचं नाव जाहीर करण्यात आलं नसून Xiao He असं टोपण नाव समोर आलं आहे. लघवी कशा पद्धतीने बाहेर येते हे जाणून घेण्याची लहान मुलांना अनेकदा उत्सुकता असते. यासाठी लहान मुले इंटरनेटचा आधार घेतात. पण या मुलाने वायरचा आधार घेत लघवी कशी बाहेर येते हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने आपल्या गुप्तांगात वायर घातली. त्यानंतर महिन्याभरानंतर त्याच्या गुप्तांगातून रक्त येण्यास सुरुवात झाली आणि पालकही घाबरले. त्यांनी या 13 वर्षांच्या मुलाला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. ड़ॉक्टरांनी नेमका काय प्रकार आहे हे तपासण्यासाठी त्याचे रिपोर्ट काढले आणि त्यांचा धक्कादायक रिपोर्ट समोर आले आहेत. त्यानंतर तात्काळ ऑपरेशन करून त्याच्या ब्लॅडरमधून ही वायर काढण्यात आली असून त्याची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण चीनमधील डोंगगुआन प्रांतातील सॉन्शन लेक सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करण्यात आलं आहे. डेली मेलमध्ये आलेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलने या संदर्भात चीनमधील मीडियावर माहिती दिली आहे. सुरुवातीला डॉक्टरांनी एक्सरे केला असता त्यांना ब्लॅडरमध्ये वायर पाहून धक्का बसला. त्यानंतर त्याने डॉक्टरांना सांगितलेल्या माहितीनुसार तीन महिन्यांपूर्वी त्याने लघवी कुठून येते हे शोधण्यासाठी ही वायर आपल्या खासगी भागातून आत सरकवली होती. त्यानंतर ही वायर बाहेर न आल्याने त्याने आपले हे कृत्य आपल्या पालकांपासून आणि सगळ्यांपासून लपवलं. त्यानंतर उपचारांसाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी कोणताही वेळ न घालवता थेट ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 2 तासांचा वेळ गेला असून cystoscope पद्धत वापरून ही 2 फूट लांबीची वायर बाहेर काढण्यात आली. हे वाचा-विमानात खेळत होती लपाछपी; फ्लाईट कर्मचाऱ्यांनी अशी अद्दल घडवली की... याविषयी माहित देताना डॉक्टर कै चोंगीये यांनी मी इतकी लांब वायर असण्याची अपेक्षा केली नसल्याचे म्हटले. कै चोंगीये यांनीच या ऑपरेशनचे नेतृत्व केले होते. त्याचबरोबर या वायरने ब्लॅडरला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. मागील काही घटनांमध्ये देखील डॉक्टरांनी आपल्या पाल्यांना याविषयी शिक्षण देण्याचं आवाहन केलं होतं. भारतातील डॉक्टर राव यांनी देशील जून महिन्यात एका मुलाच्या ब्लॅडरमधून अशाच पद्धतीने 5 फूट लांब केबल वायर काढली होती. यामध्ये त्यांनी माहिती देताना म्हटले, 4 ते 10 वर्षांच्या मुलांमध्ये त्यांनी अशा प्रकारच्या 20 ते 30 केस पहिल्या आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: