• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Girlfriend ला प्रजोप करताना अचानक गेली लाईट, अन् तरुण करुन बसला मोठी चूक

Girlfriend ला प्रजोप करताना अचानक गेली लाईट, अन् तरुण करुन बसला मोठी चूक

हातात फुलांचा गुच्छ घेऊन तरुण गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याच्या तयारीत होता, त्याचवेळी अचानक लाईट गेली.

 • Share this:
  बीजिंग, 18 नोव्हेंबर: गर्लफ्रेंडला (Girlfriend) फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज (Proposes) करायला गेलेल्या तरुणाची चांगलीत फजिती झाली आहे. अखेरच्या क्षणी लाईट गेल्यानं एकच गोंधळ उडाला. हातात फुलांचा गुच्छ घेऊन तरुण गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याच्या तयारीत होता, त्याचवेळी अचानक लाईट गेली आणि अंधारात त्याने चुकीच्या मुलीला प्रपोज केलं. लाईट लागताच समोर आपली गर्लफ्रेंड नसून दुसरी मुलगी पाहून त्याला धक्काच बसला. प्रपोज करण्यासाठी केली होती खास तयारी 'मिरर'च्या रिपोर्टनुसार, ही संपूर्ण घटना 14 नोव्हेंबर रोजी चीनच्या (China) जिआंगसू प्रांतातील लियानयुंगांग शहरात घडली. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याने (ज्याचे नाव उघड केलेले नाही) त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला गुडघ्यावर बसून आपलं प्रेम व्यक्त करायचं होतं. हेही वाचा- Dangerous! आता जगभर Monkeypoxचा फैलाव, घालू शकतो Coronaसारखा थैमान मित्रांना हसू फुटले तरुण स्टेजवर होता आणि गुडघे टेकून आपल्या मैत्रिणीला प्रपोज करणार होता, तेवढात अचानक लाईट गेली. यानंतर तो उठून चुकीच्या मुलीकडे गेला आणि तिला अंधारात प्रपोज केले. लाईट आल्यावर त्याला खूप धक्का बसतो आणि लगेच उठून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. कारण समोर जे दृश्य पाहत असतो ते पूर्णपणे वेगळं असतं. हेही वाचा- जबरा फॅन! धोनीला भेटण्यासाठी केली 1435 किमी पदयात्रा, माही भेटल्यानंतर त्याला म्हणाला...  बाजूला उभी असलेली Girlfriend ही होती हसत मात्र, या चुकीनंतरही तरुणाने प्रेयसीला प्रपोज केलं आणि तरुणीने होकार सुद्धा दिला. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मुलगा ज्यावेळी ही चूक करत होता, त्यावेळी त्याची मैत्रीण शेजारी उभी होती आणि हसत होती. नंतर लाईट आल्यावर तीही तिच्या मैत्रिणींसोबत जोरात हसायला लागली.
  Published by:Pooja Vichare
  First published: