‘या’ मॉलमध्ये फक्त 10 रुपयांत भाड्याने मिळणार गर्लफ्रेंड, अशा आहेत अटी

‘या’ मॉलमध्ये फक्त 10 रुपयांत भाड्याने मिळणार गर्लफ्रेंड, अशा आहेत अटी

तुमच्यासाठी लाईनमध्ये उभ्या असली मॉडेल, नियम वाचा आणि 10 रुपयांत मिळवा गर्लफ्रेंड.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : शॉपिंग मॉल्समध्ये आता तुम्हाला फक्त आवश्यक वस्तू किंवा कपडे नाही तर आता 'गर्लफ्रेंड'ही भाड्याने मिळणार आहे. त्यामुळं एकीकडे व्हालेंटाईनला ज्यांच्याकडे पार्टनर नाही आहे, त्यांसाठी हा चांगला नवीन पर्याय असणार आहे. या मॉलमध्ये तुम्ही एका मुलीसोबत 20 मिनिटे घालवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 10 रुपये द्यावे लागतील. या मॉलची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

द सनच्या एका वृत्तानुसार, हा मॉल चीनच्या गुओडोंग शहरात आहे. या मॉलमध्ये मुली एका लाईनमध्ये उभ्या असतात. शॉपिंगसाठी आलेले लोक 10 मिनिटांसाठी या भाड्याच्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवू शकतात. या मुली मॉडेल आहेत. आपण त्यांच्याबरोबर खरेदी करू शकता किंवा आपले खरेदी केलेले सामना त्यांना पकडायला देऊ शकता.

वाचा-VIDEO : बाबा, बायकांवर लय पैसा उडतो! मुलाला झालीय Valentines dayची अॅलर्जी

वाचा-अति तिथे माती! तोंडभरुन केक खाल्ल्याने महिलेचा गुदमरुन मृत्यू

कोणत्याही मुलीला स्पर्श करण्याची परवानगी नाही

मात्र, मॉलने एक अट ठेवली आहे. मुलीच्या परवानगीशिवाय तुम्ही तिला स्पर्श करू शकत नाही किंवा कोणत्याही कारणास्तव तिला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. आपण फक्त शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये तिच्याबरोबर फिरू शकता.

वाचा-काय म्हणावं याला! वडिलांकडे 98 कोटींची संपत्ती अन् मुलगा राहतोय भाड्याच्या घरात

20 मिनिटांनंतर मैत्रीण बदलू शकते

वृत्तानुसार, 15 मुली व्यासपीठावर उभ्या असतील आणि एखाद्याला दर 20 मिनिटांनी मैत्रीण बदलण्याची संधी मिळू शकते. खरेदी दरम्यान महिला आपल्या मुलांनाही सोपवू शकतात. द सनच्या एका वृत्तानुसार शॉपिंग सेंटरने दावा केला आहे की या ऑफरने संपूर्ण शहर प्रसिद्ध केले आहे.

First published: February 1, 2020, 1:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या