कोरोनापासून वाचण्यासाठी आता पोलिसांनीच घातलं हेलमेट, VIDEO VIRAL

कोरोनापासून वाचण्यासाठी आता पोलिसांनीच घातलं हेलमेट, VIDEO VIRAL

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी एक युक्ती वापरली आहे.

  • Share this:

मुंबई, 08 मार्च : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी एक युक्ती वापरली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण असताना त्यात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांचा अनेक लोकांसोबत संबंध येत असतो. अशावेळी कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती कशा ओळखणार हा प्रश्न असतो. अशा व्यक्ती ओळखण्यासाठी आता त्यांना स्मार्ट हेल्मेट मदत करणार आहे.

हे हेल्मेट पोलिसांनी डोक्यावर घातलं की त्यांना त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या बॉडी टेंपरेचरबद्दल माहिती मिळणार आहे. त्यामुळे कोणता व्यक्ती आजारी किंवा कोरोनाग्रस्त आहे. हे त्यांना समजण्यास अधिक सोप जाईल.

चीनमधील पोलीस अधिकाऱ्यांनी खास ह्या हेल्मेटचा वापर केला आहे. या हेल्मेटच्या मदतीनं ते कोरोना बाधित रुग्णांपासून दूर राहू शकतात असा दावा तिथल्या मीडियानं व्यक्त केला आहे.

हे वाचा-कोरोनाची इडा पीडा टळू दे, शिर्डीत महिलांनी सर्व शहरा भोवती काढली पीठाची रांगोळी

या हेल्मेटमध्ये एक इन्फ्रारेड कॅमेरा बसवण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या आधारे ताप असणारा तरुण जवळ आल्यास मजणार आहे आणि त्यानंतर जोरात अलार्म वाजेल. त्यामुळे पोलिसांना कोरोनाचं लक्षण किंवा कोण आजारी आहे हे समजू शकेल. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात येऊ शकतं. स्मार्ट हेल्मेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर जवळपास नऊशे लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. काही युझर्सनी हे हेल्मेट कोण खरेदी करू शकतं आणि कुठे मिळेल असा सवालही विचारला आहे. तर काही युझर्सनी जर खरंच कोरोनाचा रुग्ण आढळला तर गोळी घालून ठार मारणार का? असा सवालही उपस्थित केला आहे. या स्मार्ट हेल्मेटची मात्र सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

हे वाचा-स्वतःच्या नावावरच सिनेमा हिट करतात या अभिनेत्री, मानधनाचा अकडा ऐकून व्हाल थक्क

First published: March 8, 2020, 12:46 PM IST

ताज्या बातम्या