• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बॅगमध्ये ठेवलेल्या मोबाईलचा अचानक झाला स्फोट, आणि.... पाहा Viral Video

बॅगमध्ये ठेवलेल्या मोबाईलचा अचानक झाला स्फोट, आणि.... पाहा Viral Video

हा व्हायरल व्हिडीओ (Viral Video) 51 सेकंदांचा आहे. या व्हिडीओवर सोशल मीडियात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 22 एप्रिल: तरुण-तरुणी रस्त्यावरुन जात असताना अचानक तरुणाच्या बॅगेतील मोबाईलनं पेट घेतला. अचानक बॅगमधून आग लागलेली पाहताच त्या तरुणाला धक्का बसला. त्यानं ती बॅग लगेच खाली टाकून दिली आणि तो बाजूला झाला. रस्त्यावरील अन्य मंडळींना देखील ही आग पाहून धक्का बसला होता.'चायना मॉर्निंग पोस्ट'नं हा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर अपलोड केला असून सध्या तो वेगानं व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ 51 सेकंदांचा आहे. गजबजलेल्या रस्त्यावरुन तरुण-तरुणी जात असताना अचानक ही दुर्घटना घडली. त्याच्या खांद्यावरच्या बॅगेला आग लागली. 'चायना मॉर्निंग पोस्ट' नं दिलेल्या माहितीनुसार या तरुणाला सुरुवातीला स्फोटाचा आवाज आला. पण त्याला क्षणभर तो आवाज कुठून आला हे कळलंच नाही. त्या तरुणाला आपल्या बॅगेतूनच हा स्फोटाचा आवाज आल्याचं लक्षात येताच त्यानं ती बॅग फेकून दिली. याबात मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाच्या बॅगेत मोबाईल फोन होता. ज्याचा स्फोट झाल्यानं ही भयंकर आग लागली. एमसीसीपी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीच्या बॅगमध्ये सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन होता. हा मोबाईल त्यानं 2016 साली खरेदी केला होता. या मोबाईलमध्ये बऱ्याच काळापासून बॅटरीची समस्या होती. ही आग लागली त्यावेळी मोबाईल पूर्णपणे डिस्चार्ज होता. या पोस्टवर सोशल मीडियातून लोकं अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: