बीजिंग, 03 नोव्हेंबर : ड्रग्जचे सेवन करणं लोकांना महागात पडतं. मात्र या ड्रग्जमुळे एका चिनी व्यक्तीनं लोकांचा फायदा गेला. चीनमधील एका 29 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही अटक त्यानं ड्रग्ज केले म्हणून नाही तर त्यानंतर बाल्कनीमधून पैसे उडवल्यामुळे करण्यात आली.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक लोकांना आकाशातून पैशांचा पाऊस पडत असल्याचे दिसले. त्यानंतर रहदारी थांबली आणि सर्व पैसे जमा करण्यासाठी गर्दी करू लागले. यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या. विनाकारण लोकांची गर्दी जमावल्यामुळे आणि नारकोटिक्स गैरवर्तन अंतर्गत या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा-VIDEO: एक डाव भुताचा; मुलाला भुताने उचलून नेलं आणि...
वाचा-कारच बोनेट उघडताच दिसला 10 फूटांची अजगर, पुढे काय झालं पाहा VIDEO
ही घटना काही दिवसांपूर्वी नैऋत्य चीनमधील शॉपिंग्बा येथे घडली होती. चिनी पोलिसांनी अशी माहिती दिली की, दुपारी दीडच्या सुमारास, शॉपिंग्बा जिल्ह्यातील एका 29 वर्षीय व्यक्तीने आपल्या घरात मिथ ड्रग्सचे सेवन केले. त्यानंतर नशेल त्यानं बाल्कनीतून पैसे फेकले.
वाचा-कारच बोनेट उघडताच दिसला 10 फूटांची अजगर, पुढे काय झालं पाहा VIDEO
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती 30 व्या मजल्यावरील अपार्टमेंटमधून पैसे टाकताना दिसत आहे. आकाशातून पैशांचा पाऊस पाहून प्रवाशांनी व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, या तरुणानं बाल्कनीतून किती पैसे खाली टाकले हे प्रशासनाने उघड केले नाही.