बाबो! 23 जणांना घेऊन डेटवर पोहचली गर्लफ्रेंड, 2 लाखांचं बिल पाहून पळून गेला प्रियकर

बाबो! 23 जणांना घेऊन डेटवर पोहचली गर्लफ्रेंड, 2 लाखांचं बिल पाहून पळून गेला प्रियकर

एक तरूण आपल्या गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेला आणि बिल न भरताच पळून गेला.

  • Share this:

बीजिंग, 21 ऑक्टोबर : हल्ली रिलेशनशिपमध्ये जाण्याआधी तरूण-तरुणी एकमेकांसोबत डेटवर जातात. म्हणजेच फिरायला जातात. ही डेट रोमॅंटिक करण्यासाठी विविध युक्त्या तरुण काढतात, मात्र बीजिंगमध्ये भलताच प्रकार पाहायला मिळाला. एक तरूण आपल्या गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेला आणि बिल न भरताच पळून गेला. खरतर ही तरूणी डेटवर तिच्या इतर 23 मित्रांसह आली होती आणि त्यांचे खाण्याचे बिल लाखोंच्या घरात गेले होते. हे बिल न भरताच हा मुलगा पळून गेला. ही एक ब्लाइंड डेट होती, याआधी हे दोघं फक्त एकमेकांशी फोनवर बोलत होते.

ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, तरुणीने सांगितले की तिने आपल्या प्रियकराचे औदार्य तपासण्यासाठी आपल्या 23 मित्रांना ब्लाइंट डेटवर घेऊन आली. सुरुवातीला सर्व काही ठीक होते मात्र वाढते बिल पाहून तिचा प्रियकर घाबरून गेला आणि तिला सोडून पळून गेला. तरुणीच्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा रात्रीचे जेवण संपल्यानंतर बिल देण्याची वेळ आली तेव्हा हा तरूण पळून गेला होता. त्यानंतर तरुणीला रेस्टॉरंटचे बिल 19,800 युआन (2 लाख 17 हजार 828 रुपये) भरावे लागले.

वाचा-4 विद्यार्थ्यांनी हादरवलं अख्खं शहर, फटाक्यांमधून दारू काढून बनवला मोठा बॉम्ब

आईनेच प्लॅन केली होती डेट

रिपोर्टनुसार, हा प्रकार पूर्व चीनच्या झेजियांग प्रांताचे आहे. या तरुणाची डेट आईनेच ठरवली होती. लियू नावाचा एक तरुण त्याच्या आईने निश्चित केलेल्या ब्लाइंड डेटला गेला. यापूर्वी तो या तरुणीला कधीच भेटला नव्हता. मात्र 2 लाखांचे बिल पाहून लियू पळून गेला.

वाचा-OMG! 9 महिन्यांची गर्भवती 5 मिनिटांत धावली 1.6 किमी; पाहा VIDEO

दरम्यान जेव्हा तरुणीनं लियूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन लागला नाही. त्यानंतर तरुणीलाच 2 लाखांचे बिल भरावे लागले. यानंतर, जेव्हा तरुणीने याबाबत पोलिसांत तक्रार केली, तेव्हा पोलिसांनी लियूचा तपास सुरू केला. पोलिसांनी लियूला पकडल्यानंतर त्यानं सांगितले की, दोन टेबलचं बिलं देण्याचं त्यानं मान्य केलं होतं. चीनच्या सोशल मीडियामध्येही ही न्यूज व्हायरल होत असून नेटकरी तरुणीवर टीका करून लियूचे समर्थन करत आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 21, 2020, 11:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या