Home /News /viral /

OMG! जोराच्या वाऱ्यात तुटला चीनचा Glass bridge; 330 फूट उंचावर लटकत राहिला पर्यटक आणि...

OMG! जोराच्या वाऱ्यात तुटला चीनचा Glass bridge; 330 फूट उंचावर लटकत राहिला पर्यटक आणि...

काचेचा पूल (glass bridge) तुटला तेव्हा पर्यटक पुलाच्या एका भागावर अडकला.

बीजिंग, 12 मे : जगभरात असे अनेक ब्रीज (bridge) आहेत, जे पाहूनच धडकी भरते. अशाच ब्रीजपैकी एक म्हणजे चीनमधील ग्लास ब्रीज (China Glass bridge) म्हणजे काचेचा पूल. हा पूल पाहताच प्रत्येकाच्या मनात सर्वात पहिला विचार येतो तो म्हणजे का पूल चालताना अचानक तुटला तर... असंच प्रत्यक्षात घडलं आणि त्यानंतर जे घडलं, ते धडकी भरवणारं आहे. चीनमध्ये एक पर्यटक 330 फूट उंच ग्लास ब्रीजवर (Glass bridge) चालत होता. मात्र अचानक जोराचा वादळी वारा आला आणि हा पर्यटक 100 मीटर हवेत लटकत होता. वाऱ्याचा जोर इतका होता की ब्रीजच्या काही भागातील काचा उडून नुकसान झालं. ही घटना जिलिन प्रांतातील पियान माउंटन (Piyan Mountain) येथील रिसॉर्टमध्ये काचेच्या ब्रिजवर घडली. दरम्यान या ब्रिजवर अडकलेल्या पर्यटकाला वाचवण्यात आलं असून तो सुखरुप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सर्वप्रथम चीनच्या ‘वेईबो’(Weibo)या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यानंतर ‘मॅट नाइट’ (Matt Knight) नावाच्या एका ट्विटर युझरनेदेखील याची माहिती दिली. हा ब्रीज आधी कसा होता याचा व्हिडीओही त्याने शेअर केला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, तिथं 150 किमी प्रति तासाच्या वेगाने वारा वाहत होता. त्यामुळे पुलाच्या अनेक काचांचं नुकसान झालं. या जोरदार वाऱ्यामुळे तो पर्यटक पुलाच्या एका भागावर अडकला. तो जवळजवळ एक तास तिथं लटकत होता. त्यानंतर पोलीस,अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी तिथं पोहोचले आणि त्या पर्यटकाला पुलावरून सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळे घाबरलेल्या त्या पर्यटकाला समुपदेशनासाठी मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला काहीच दुखापत झाली नसून तो सुरक्षित आहे. हे वाचा - VIDEO : नवरीची एन्ट्री आहे की, Undertaker ची; असं स्वागत तुम्ही कधीच पाहिलं नसेल दरम्यान ते रिसॉर्ट बंद करण्यात आलं असून काचेचे पॅनेल कसे फुटले, याचा तपास केला जाणार आहे. लाँग जिंगसिटी गव्हर्मेंटनेही याबाबत माहिती मागवली आहे. चीनच्या माउंटन रिसॉर्टमध्ये( Chinese mountain resorts) पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काचेचं तळ असलेले अनेक लोकप्रिय पूल आहेत. चीनच्या हुनान प्रांताच्या (Hunan province) वायव्येकडील झांगझियाजी (Zhangjiajie) शहरात काचेचा एक प्रसिद्ध पूल आहे.जो जमिनीपासून 300 मीटर उंचीवर आहे. हे वाचा - OMG! 2026 ला जग अंधारात बुडणार? टाइम ट्रॅव्हलरच्या दाव्याने वाढलं टेन्शन हा ब्रिज दोन उंच खडकांमध्ये बांधलेला असून तो 430मीटर लांब आणि 6 मीटर रुंद आहे. या पुलाची अप्रतिम छायाचित्रे सोशल मीडियावर उपलब्ध असून ती नेटकऱ्यांना भुरळ घालतात. असा पूल प्रत्यक्ष अस्तित्वात आहे, याबद्दल लोकांना विश्वासच बसत नाही. त्याच्या दिसण्यावरून हा ब्रिज ‘बेंडिंग ब्रिज’ म्हणून ओळखला जातो. त्याचं उद्घाटन 2017 मध्ये करण्यात आलं होतं आणि गेल्या वर्षी तो ब्रिज स्थानिकांसाठी उघडण्यात आला होता. हा ब्रिज चीनमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
First published:

Tags: China, Shocking news, World news

पुढील बातम्या