मुंबई 7 नोव्हेंबर : सोशल मीडिया व्हिडीओचं एक भंडार आहे. इथे तुम्ही एकदा का आलात की तुम्हाला इतके व्हिडीओ पाहायला मिळतात की ते पाहाताना आपला तासनतास वेळ कसा निघून जातो. हे आपलं आपल्यालाच कळत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहाताना तुम्हाला आश्चर्य वाटेल.
हा व्हिडीओ चीन मधील असल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये विचित्र आणि कठीण प्रकारे एक गाडी चालताना दिसत आहे.
हा व्हिडिओ चीनमध्ये होणाऱ्या ड्रायव्हिंग टेस्टचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओवर 'चीनमधील ड्रायव्हर लायसन्स परीक्षा स्टेशन' असे लिहिले आहे.
आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की, हा व्हिडीओ ड्रायव्हिंग लायसन्सच्या परीक्षेचा आहे. ज्यामुळे तो पाहाता इतका कठीण वाटत आहे.
या व्हिडीओमध्ये ज्या रस्त्यावरुन गाडी चालवायची असेल, तो रस्ता पांढऱ्या रंगात दाखवण्यात आला आहे. हा रस्ता साधा सरळ नाही, तर वेडी-वाकडी वळणांचा आहे. त्यात पार्किंगमध्ये एक पांढरी कार दिसते. ज्यानंतर ही कार त्या रस्त्याला फॉलो करत आहेत.
व्हिडीओच्या सुरुवातीला, कार एका झिगझॅग ट्रॅकवर जाऊ लागते. त्यानंतर चालक गाडी रिव्हर्स करून पार्किंगमध्ये नेतो. गाडी चालवताना एक अट अशी होती की, त्याने गाडी बाजूच्या कोणत्याच लाईनीला टक करायला नको हवी होती.
Driver license exam station in China pic.twitter.com/BktCFOY4rH
— Tansu YEĞEN (@TansuYegen) November 4, 2022
हा व्यक्ती जेव्हा गाडी चालवतो, तेव्हा टेस्ट घेणाऱ्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती पुढे येते आणि रेष तपासते की त्या व्यक्तीने गाडी चालवताना रेष ओलांडली आहे की नाही.
यानंतर, गाडीचा चालक आठच्या आकारात बनवलेल्या लांब मार्गावर गाडी चालवतो. यादरम्यान गाडी पुढे जाते आणि काही काळ मागे येते. शेवटी ड्रायव्हरने गाडी पार्किंगमध्ये उभी केली.
व्हिडीओ पाहिल्यानंतर इंटरनेट वापरकर्ते आश्चर्यचकित झाले आहेत. जगभरातील लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच वेळी, अनेक वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये ड्रायव्हिंग चाचणीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
त्याचवेळी भारतातील लोकांनी देखील यावर आपले मत मांडले आहे. लोकांच्या मते ही टेस्ट जर भारतात ठेवली तर संपलंच सगळं, तसेच अनेक भारतीय युजर्सचं असं म्हणणं आहे की, भारतीय यापेक्षाही कठीण गाडी चालवू शकतात. त्यांना अशीप्रकारे गाडी चालवण्याची सवय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Video viral, Viral