Home /News /viral /

अरे काय हे! नाचतानाच स्टेजवर झोपली ही चिमुरडी, पुढं काय झालं पहा व्हायरल VIDEO

अरे काय हे! नाचतानाच स्टेजवर झोपली ही चिमुरडी, पुढं काय झालं पहा व्हायरल VIDEO

Kids Cute Video: लहान मुलांचं विश्वच वेगळं असतं. या व्हिडिओतली गोड गंमत तुम्हाला नक्की आवडेल.

    झेजियांग, 8 एप्रिल : लहान मुलांचं जग अगदी निष्पाप आणि नितळ असतं. त्यांच्या चुकासुद्धा गोड वाटतात. त्यांच्या लहानसहान कृती कमालीच्या मोहक वाटतात. यामुळेच सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ क्षणात व्हायरल होतात. (viral video) असाच एक व्हिडिओ सध्या खूप लोकप्रिय झाला आहे. अगदी साधासुधा असा हा व्हिडिओ सगळ्यांनाच खूप आवडतो आहे. यात काही लहान मुली स्टेजवर नृत्य करत आहेत. आणि नृत्य रंगात आलेलं असतानाच अचानक असं काही होतं की लोक एकदमच हसू फुटतं. लोक त्या मुलीजवळ जाऊन तिचे व्हिडिओही बनवू लागतात. (china cute dancing girl) पूर्व चीनमधील झेजियांग प्रांतातल्या व्हेन्झोऊ या शहरातील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत सुंदर सजलेल्या मुलींचा ग्रुप स्टेजवर अतिशय आकर्षक नृत्य करत आहे. मोठ्या स्टेजवर लाईट्स लावलेले आहेत. काही लोक कौतुकानं आपापल्या मोबाईलवर या परफॉर्मन्सला शूटही करत आहेत. हेही वाचा Shocking! डेंजर आइसलँडवर व्हॉलीबॉल; ज्वालामुखीतून धगधगता लाव्हा वाहू लागला आणि.. मात्र एकाएकी स्टेजच्या सर्वात समोर बसून नृत्य करणाऱ्या जोडीपैकी एक मुलगी अजिबातच हालचाल करत नसल्याचं लक्षात येतं. (sleeping beauty on dance stage viral video) या मुलीची जोडीदार तिला निरखून पाहते. लक्षात आल्यावर हळूच तिला उठवण्याचाही प्रयत्न करते. मात्र ती काही दाद देत नाही. भर स्टेजवर अगदी शांत निरागस झोपलेल्या या गोड मुलीला पाहून लोक कौतुकमिश्रित आश्चर्यानं हसू लागतात. एकजण तिचा व्हिडिओ बनवतो. (girl sleeps while dancing viral video) हेही वाचा वजन वाढल्याने मांजरालाही आलं टेन्शन; एक्सरसाइज करतानाचा VIDEO VIRAL या मुलीच्या आईचं म्हणणं आहे, की तिची मुलगी दुपारच्या जेवणादरम्यान अगदी काही मिनिटांची डुलकी घेत असते. मात्र डान्सच्या दिवशी तिला ते शक्य झालं नाही. ती इतकी थकली, की स्टेजवरच झोपी गेली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: China, Dance video, Small girl, Viral video.

    पुढील बातम्या