मराठी बातम्या /बातम्या /Viral /शेवटच्या क्षणी काय झालं?; China Boeing 737 Crash चा भयावह Live Video आला समोर

शेवटच्या क्षणी काय झालं?; China Boeing 737 Crash चा भयावह Live Video आला समोर

चिनी विमान अपघातात शेवटच्या क्षणी काय घडलं हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

चिनी विमान अपघातात शेवटच्या क्षणी काय घडलं हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

चिनी विमान अपघातात शेवटच्या क्षणी काय घडलं हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

बीजिंग, 21 मार्च : चीनमध्ये सोमवारी प्रवासी विमान क्रॅश (China plane crash) झालं. या विमानाला भयंकर दुर्घटना झाली (China plane accident). या अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ आता समोर आला आहे. हा संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शेवटच्या क्षणी या विमानासोबत नेमकं काय घडलं, हे सर्वकाही या व्हिडीओत दिसून येतं आहे. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे ( Aviation accident and incident).

चाइना ईस्टर्न एयरलाइनचं (China Eastern Airlines) MU 5735  हे बोइंग 737 (Boeing 737) विमान गुआंग्शी प्रदेशातील वुझोउ शहराजवळील ग्रामीण भागात कोसळलं. यानंतर डोंगराळ ठिकाणी आग लागली. रिपोर्टनुसार एका स्थानिक खाण कंपनीच्या सिक्युरिटी कॅमेऱ्यात या विमानाच्या अपघाताचं दृश्य कैद झालं.  @ChinaAvReview ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हे वाचा - ..म्हणून Mariupol प्रतिष्ठेचा प्रश्न;ताबा मिळवण्यासाठी रशिया-युक्रेनमध्ये संघर्ष

स्थानिक वेळेनुसार या विमानाने दुपारी 1:10 मिनिटांनी कुनमिंगवरून टेक ऑफ केलं होतं.  दुपारी 2:52 वाजता ते गुआन्झोला पोहोचणार होतं. मात्र त्याआधीच ही दुर्घटना घडली. व्हिडीओत पाहू शकता विमान वेगाने आकाशातून सरळ जमिनीच्या दिशेने येताना दिसतं आहे. शिवाय विमानाचे काही भाग सर्वत्र पसरलेले दिसत आहे. या अपघाताचं कारणही अद्याप समजू शकलेलं नाही.

चीनच्या नागरी उड्डाण विभागाच्या माहितीनुसार, विमानात एकूण 132 लोक होते. त्यात 123 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्सचा समावेश होता. या दुर्घटनेत किती जण वाचले, किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. सर्वांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

हे वाचा - तरुणाने स्वतःच स्वतःला पेटवलं आणि...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

ज्या विमानाचा अपघात झाला आहे ते केवळ साडेसहा वर्ष जुनं होतं. जून 2015 मध्ये ते एअरलाइन्सने ताब्यात घेतलं होतं. MU 5735 मध्ये एकूण 162 जागा होत्या, त्यापैकी 12 बिझनेस आणि 150 इकॉनॉमी क्लास होत्या. बोइंग 737 मॉडेलची विमानं यापूर्वीही अनेकदा अपघाताचे बळी ठरले आहेत.

First published:
top videos

    Tags: Accident, Airplane, China, Viral, Viral videos