Home /News /viral /

…आणि कुत्र्याच्या पट्ट्यावर पाय देताच झाला महिलेचा मृत्यू! CCTV VIDEO पाहूनच कळेल नेमकं काय झालं

…आणि कुत्र्याच्या पट्ट्यावर पाय देताच झाला महिलेचा मृत्यू! CCTV VIDEO पाहूनच कळेल नेमकं काय झालं

हा CCTV VIDEO व्हिडीओ पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल की या महिलेचा मृत्यू नेमका झाला कसा.

    बीजिंग, 23 ऑगस्ट : मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे. पण काळ आणि वेळ कशी असेल हे कोणालाच सांगता येत नाही. कधी-कधी अनपेक्षितपणे अशा काही गोष्टी घडतात की त्यावर विश्वासही बसत नाही. असाच एक प्रकार चीनमध्ये घडला. चीनमध्ये कुत्र्याच्या पट्ट्यावर पाय दिल्यामुळे एका 88 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा इतका विचित्र अपघात होता की, त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांचाही यावर विश्वास बसला नाही. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर नेकमं काय घडलं, याचा उलगडा झाला. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एक कुत्रा रस्त्यानं धावत येताना दिसत आहे. 88 वर्षीय महिला रस्त्याच्या मध्यभागी उभी असताना कुत्रा धावत आला, त्याचवेळी या महिलेचा पाय कुत्र्याच्या पट्ट्यात अडकला. कुत्रा तसाच धावत सुटला, परिणामी महिलेचे डोके रस्त्यावर आपटले. मोठ्या प्रमाणावर रस्तस्त्राव झाल्यामुळे या महिलेचा जागीत मृत्यू झाला. मुख्य म्हणजे रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडला. रस्त्यावर उपस्थित लोकांनाही काय झाले हे कळले नाही. त्यांनी महिलेला रुग्णालयात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. ही घटना दक्षिण-पूर्वेच्या चीनच्या गुआंग्डोंग प्रांतातल्या झिंगटान शहरात 17 ऑगस्ट रोजी घडली. वाचा-भरधाव येणारा ट्रक पाण्यासोबत गेला वाहून, पाहा LIVE VIDEO वाचा-एका सेकंदानं हुकला मृत्यू! स्पीडमध्ये अगदी जवळून गेली महिंद्रा व्हॅन अन् तो... मृत 88 वर्षीय वृद्ध महिलेचे नाव माई असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या महिलेच्या डोक्याला पडल्यामुळे गंभीर जखम झाली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुत्रा पाळीव असून सीसीटीव्हीमध्ये आपल्या 12 वर्षीय मुलीसोबत जाताना दिसत आहे. मात्र मध्येच 12 वर्षीय मुलीच्या हातातून पट्टा सुटला आणि कुत्रा पळू लागला. वाचा-बापरे! उंदारामुळे जळालं ऑफिस, चौकशीदरम्यान समोर आले धक्कादायक PHOTOS पोलीस सध्या या विचित्र अपघाताचा शोध घेत असून, या कुत्र्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या