मराठी बातम्या /बातम्या /Viral /

100 फुटांवरून खाली पडला 2 वर्षांचा चिमुकला, श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO

100 फुटांवरून खाली पडला 2 वर्षांचा चिमुकला, श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO

या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी बेडरूममध्ये बंद करून ठेवलं होतं. काय घडलं पाहा VIDEO

या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी बेडरूममध्ये बंद करून ठेवलं होतं. काय घडलं पाहा VIDEO

या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी बेडरूममध्ये बंद करून ठेवलं होतं. काय घडलं पाहा VIDEO

  • Published by:  Kranti Kanetkar
बीजिंग, 17 जुलै: खेळताना अचानक इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून मुलगा खाली पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना घडली तेव्हा खाली उभ्या असलेल्या व्यक्तीनं हे पाहिले आणि या मुलाचा जीव वाचवला. घटनेचा श्वास रोखून ठेवणारा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना चीनच्या जिआंग्सु प्रांतताच्या हुवाई शहरात घडली आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार हा मुलगा 2 वर्षांचा आहे. ही घटना चीनमधील असल्याची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की चिमुकला साधारण 100 फूट उंचीवर असलेल्या बाल्कनीच्या टोकावर लटकलेला होता. खिडकीतून तोल गेल्यानं खाली पडला. त्यानं खिडीबाहेर असलेल्या स्लोपला घट्ट पकडून धरलं आणि वाचवण्यासाठी ओरडू लागला. त्याच दरम्यान खाली उभ्या असलेल्या तरुणानं या मुलाचा जीव वाचवला आहे. हा तरुण देवदूतच बननून आला आणि त्यानं चिमुकल्याला वाचवलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा-हनीमूनसाठी जमवले होते 6 लाख, होणाऱ्या नवऱ्याने न सांगता खरेदी केला गेमिंग पीसी चिनी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार चिमुकला घरात एकटाच होता. त्याला बेडरुममध्ये पालकांनी बंद करून ठेवलं होतं मात्र घाईत असल्यानं बेडरूमची खिडकी बंद करायला विसरले. या चिमुकल्यानं आधी खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एअर कंडिशन ठेवलेल्या स्लोपवर अडकल्यानं तो घाबरला. त्यामुळे त्याचे खिडकीला पकडलेले हात सुटले आणि खाली पडणार एवढ्यात त्याला तरुणानं वाचवलं. या चिमुकल्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोणतीही दुखापत झाल्याची माहिती मिळाली नाही.
First published:

Tags: China, Viral video.

पुढील बातम्या