मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : करायचं होतं एक, झालं दुसरंच; चिमणी पाडताना इमारतच कोसळली

VIDEO : करायचं होतं एक, झालं दुसरंच; चिमणी पाडताना इमारतच कोसळली

viral video

viral video

अचानक धुराड्यांच्या तळाशी स्फोट होतो. चार धुराड्यांपैकी तीन धुराडी एका दिशेला कोसळतात तर एक धुराडं चुकीच्या दिशेला कोसळतं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 27 जानेवारी : एखादी मोठी वास्तू पाडण्यासाठी तिच्या पृष्ठभागावर स्फोट घडवून आणला जाो. तुम्ही तसं कदाचित प्रत्यक्ष पाहिलं असेल किंवा व्हिडिओही पाहिले असतील. यासाठी काही वेळा संपूर्ण वास्तूत स्फोटकं पेरली जातात. नोएडा इथल्या एका ट्विन टॉवरवर अशाच पद्धतीने स्फोटकं लावण्यात आली आणि स्फोट घडवून ते पाडण्यात आले. अशा प्रकारच्या कामांमध्ये सावधगिरीपेक्षा कॅल्क्युलेशनची जास्त गरज असते. स्फोटकं चुकीच्या पद्धतीने बसवली गेली असतील, तर मोठा अनर्थ होऊ शकतो. एका ठिकाणी नुकताच असा प्रकार पाहायला मिळाला. यात चिमणी पाडण्याच्या कामात चिमणीच्या जवळची एक इमारतही जमीनदोस्त झाली. @cctv_idiots या ट्विटर अकाउंटवरून नुकताच एक व्हायरल हॉग अकाउंटचा एक व्हिडिओ शेअर केला गेला. या व्हिडिओत ही धक्कादायक घटना पाहायला मिळते.

  पत्त्याप्रमाणे कोसळली चिमणी

  या व्हायरल व्हिडिओत एक कंपनी आणि काही चिमण्या अर्थात धुराडी उभारल्याचं दिसत आहे. या धुराड्यांच्या लगतच उंच गोलाकार इमारत दिसत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. अचानक या धुराड्यांच्या तळाशी स्फोट होतो. चार धुराड्यांपैकी तीन धुराडी एका दिशेला कोसळतात तर एक धुराडं चुकीच्या दिशेला कोसळतं. हे धुराडं लगतच्या गोलाकार इमारतीवर आदळतं आणि ती इमारत खेळातल्या पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळून जमीनदोस्त होते. हे चित्र पाहून व्हिडिओ शूट करणाऱ्यांनाही धक्का बसतो. नेटिझन्सनी कमेंटमध्ये अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रियादेखील व्यक्त केल्या आहेत.

  हेही वाचा : नवरीला उचलताना नवरदेवही खाली पडला, नंतर त्याने जे केलं ते पाहून आवरणार नाही हसू

  व्हिडिओवर अनेकांनी केल्या कमेंट्स

  या व्हिडिओला सुमारे दोन लाख व्ह्यूज मिळाले आहेत. काही जणांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. यात एक युजर म्हणतो, `स्फोट करणारे खूप हुशार आहेत आणि त्यांना त्यांचं काम माहिती असतं. त्यामुळे ही त्यांची फक्त ट्रिक आहे, त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही.` दुसऱ्या एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं आहे, `हे सर्व नियोजनानुसार घडलं आहे. महागडी स्फोटकं वापरण्याऐवजी चिमणीच्या माध्यमातूनच इमारत पाडण्याचं काम सुरू आहे.` एकाने वेगळ्या अँगलने व्हिडिओ शूट केला आहे, ज्यामध्ये इमारतीवर चिमणी कोसळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसेल, हे नक्की.

  First published:

  Tags: Viral videos