'माझी काही चूक नाही... तुम्ही बलात्कारी आहात', सोशल मीडियावर VIDEO VIRAL

'माझी काही चूक नाही... तुम्ही बलात्कारी आहात', सोशल मीडियावर VIDEO VIRAL

सध्या सोशल मीडियावर लैंगिक शोषण आणि हिंसाचार याविरुद्ध महिलांनी एका मोर्चात गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

सेंटियागो, 06 डिसेंबर : सध्या भारतात हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरची चर्चा आहे. त्याआधी या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फासावर लटकवण्यात यावं अशी मागणी करत देशभर संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाच्या तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत चारही आरोपी जागीच ठार झाले. यातच सोशल मीडियावर चिली देशात बलात्कार करणाऱ्यांविरोधात महिलांनी काढलेल्या मोर्चात गायलेलं गाणं व्हायरल झालं आहे.

चिलीमध्ये गेल्या सहा आठवड्यांपासून प्रदर्शनं सुरु आहेत. राजधानीतील स्टेडियममध्ये महिलांविरोधात होत असलेले गुन्हे आणि लैंगिक अत्याचाराविरुद्ध निषेध आंदोलन केलं. एक महिन्याहून जास्त वेळ या आंदोलनात लैगिंक अत्याचाराविरुद्ध महिलांनी गाणं गातं निषेध केला. याकडे आता जगाचं लक्ष वेधलं आहे.

सेंटियागोत सर्व वयातील महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. काळे कपडे आणि लाल स्कार्फ घालून ब्लाइंडफोल्ड होऊन निषेध केला जात आहे. बुधवारी झालेल्या महिलांच्या या आंदोलनाची चर्चा सोसल मिडियावर होत आहे.

महिलांनी जे गाणं म्हटलं त्याचा मतितार्थ असा होता की, माझी काही चूक नाही आहे.. मी कुठेही नव्हते आणि मी कसलेही कपडे घातले नव्हते... तर तुम्ही बलात्कारी आहात. मोठ्या संख्येनं महिलांनी एका ताला सुरात गायलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चिलीतील वेगवेगळ्या शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने लोक निषेधाचे आंदोलन केलं जात आहे. यामध्ये 10 लाखांहून अधिक लोकांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. याआधी 1990 मध्ये हुकुमशहा अगुस्तो पिनोशेविरुद्ध मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतरचा हा सर्वात मोठा मोर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 12:42 PM IST

ताज्या बातम्या