मुंबई, 29 एप्रिल : लहान मुलं मस्तीखोर, खट्ट्याळ, खोडकर असतात. पण ते बऱ्याचदा असं काही करतात जे मोठ्या व्यक्तीही करू शकत नाही. अशाच चिमुकल्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
(Child video). ज्यांच्या एका छोट्याशा पावलामुळे किती तरी लोकांचा जीव वाचला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मोठ्या माणसांनाही लाज वाटेल
(Child covering open manhole on road).
मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. पण काही वेळा आपला दुर्लक्षपणा, बेजबाबदारपणा यामुळे आपण स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देतो. या मुलांनी अशाच मृत्यूपासून किती तरी लोकांना वाचवलं आहे.
व्हिडीओत पाहू शकता दोन मुलं रोडवरून चालत आहेत. चालताना त्यांना रस्त्यात समोर एक मोठा खड्डा दिसतो. हा मॅनहोल आहे. पण त्यावर झाकण नव्हतं. ते उघडंच होतं. कुणाचं लक्ष नसेल तर या मॅनहोलमध्ये पडून कुणाचाही मृत्यू झाला असता. हे मोठ्या माणसांच्या नाही पण या चिमुकल्यांच्या लक्षात आलं. किती तरी लोक या रस्त्यावरून गेले असतील पण सर्वांनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही. या मुलांनी मात्र करून दाखवलं.
हे वाचा - भलामोठा ट्रक चिरडणार तोच..., स्वतःही मृत्यूच्या दारात असताना आईने लेकाला वाचवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO
त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेले मोठे दगड उचलले आणि ते या मॅनहोलच्या तिन्ही बाजूंनी तीन दगड लावले. जेणेकरून लोकांना तिथं धोका आहे हे समजेल आणि ते तिथून जाणार नाहीत. त्यानंतरच ही मुलं तिथून निघून जातात.
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे माहिती नाही. पण मोठ्या माणसांना या मुलांनी खूप काही शिकवलं आहे. ट्विटर पर @MorissaSchwartz अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या मुलांनी सर्वांचं मन जिंकलं आहे. त्यांचं कौतुक केलं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.