मराठी बातम्या /बातम्या /Viral /मूर्ती लहान पण किर्ती महान! कुत्र्याची तहान भागवण्यासाठी चिमुकल्याची धडपड होतेय व्हायरल; पाहा VIDEO

मूर्ती लहान पण किर्ती महान! कुत्र्याची तहान भागवण्यासाठी चिमुकल्याची धडपड होतेय व्हायरल; पाहा VIDEO

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं, की एक छोटासा मुलगा हातपंपाच्या मदतीने कुत्र्याला पाणी (Thirsty dog viral video) पाजत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं, की एक छोटासा मुलगा हातपंपाच्या मदतीने कुत्र्याला पाणी (Thirsty dog viral video) पाजत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं, की एक छोटासा मुलगा हातपंपाच्या मदतीने कुत्र्याला पाणी (Thirsty dog viral video) पाजत आहे.

  नवी दिल्ली, 10 डिसेंबर : इंटरनेटवर आपण बऱ्याच प्रकारचे व्हिडीओ पाहतो. काही व्हिडीओ (Viral videos) आपल्याला लोटपोट होईपर्यंत हसवतात, तर काही व्हिडीओंमध्ये प्राण्यांच्या मजेशीर करामती कैद झालेल्या असतात. यांपैकी काही व्हिडीओ एकदम निरागस अशा लहान मुलांचे असतात. काही दिवसांपूर्वी कोंबडीच्या पिल्लाला डॉक्टरकडे घेऊन जाणाऱ्या लहान मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता अशाच एका चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक लहानगा रस्त्यावरील कुत्र्याला पाणी पाजताना (Child quenched dogs thirst viral video) दिसत आहे. मुलं ही देवाघरची फुलं असं म्हटलं जातं. पण या मुलाने आपल्या निस्वार्थ कृतीतून हे सिद्ध करून दाखवलं आहे.

  व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं, की एक छोटासा मुलगा हातपंपाच्या मदतीने कुत्र्याला पाणी (Thirsty dog viral video) पाजत आहे. खरंतर हा मुलगा एवढा लहान आहे, की तो हातपंप हापसण्यासाठी त्याला आपला संपूर्ण जोर लावावा लागत आहे. मात्र, तरीही तो हार न मानता अगदी उड्या मारुन का होईना, हातपंप हापसतच (Kid using handpump video) आहे. या चिमुरड्याची ही भूतदया पाहून नेटीझन्स त्यावर अगदीच खूश झाले आहेत. हजारो लोकांनी त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

  छोट्या खिडकीतून चोराची एन्ट्री; ट्रिक पाहून पोलिसही चक्रावले, तुम्ही पाहिला का VIDEO

  आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा (Deepanshu Kabra twitter) यांनीदेखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. “कितीही छोटी उंची असली, तरी सर्व जण कोणाची तरी मदत करूच शकतात. वेल डन किड! गॉड ब्लेस यू!” अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे. दीपांशू यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला काही तासांमध्येच 22 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. यावर कित्येक लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. “उंची लहान पण हृदय विशाल”, “खूपच सुंदर” अशा कमेंट्स दीपांशू यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला मिळत आहेत.

  दीपांशू यांनी या व्हिडीओचा सोर्स सोशल मीडिया असल्याचे स्पष्ट केले आहे. दीपांशू व्यतिरिक्तही अनेक लोकांनी आपापल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट आणि शेअर केला आहे. एकंदरीत देशभरातील हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहून त्याची प्रशंसा केली आहे. “मी या मुलाच्या प्रेमात पडलो आहे”, “या वर्षातील पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट” अशा शब्दांमध्ये लोक या मुलाची आणि व्हिडीओची प्रशंसा करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीदेखील नक्कीच या मुलाचे कौतुक केल्यावाचून राहणार नाही!

  First published:

  Tags: Viral, Viral videos