Home /News /viral /

सांडपाण्याच्या 20 फूट खोल नाल्यात कोसळला चिमुकला; बचावासाठी आईनेही घेतली उडी अन्.., VIDEO

सांडपाण्याच्या 20 फूट खोल नाल्यात कोसळला चिमुकला; बचावासाठी आईनेही घेतली उडी अन्.., VIDEO

काही सेकंदानंतर या चिमुकल्याला अचानक काहीतरी कुतूहल वाटतं आणि तो सांडपाण्याच्या नाल्यावर असलेल्या कव्हरकडे परत जातो. यानंतर कव्हरवर पाय ठेवताच लगेचच हे झाकण पलटतं आणि थियो खोल नाल्यात कोसळतो

    नवी दिल्ली 27 मे : एका महिलेने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी 20 फूट खोल सांडपाण्याच्या नाल्यात उडी मारल्याचा भीषण क्षण एका व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. यूकेमधील केंट येथे रविवारी ही घटना घडली, जेव्हा 23 वर्षीय एमी ब्लिथ तिच्या 18 महिन्यांच्या मुलासोबत फिरत होती. शेजारच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Shocking CCTV Footage) ही घटना कैद झाली. यात महिलेचा मुलगा तिचा हात धरून एका सांडपाण्याच्या नाल्यावरुन जाताना दिसत आहे. VIDEO: सहाव्या मजल्याहून कोसळली आणि खिडकीला लटकली चिमुकली, मदतीसाठी हाक देत होती इतक्यात.. काही सेकंदानंतर अचानक या चिमुकल्याला अचानक काहीतरी कुतूहल वाटतं आणि तो सांडपाण्याच्या नाल्यावर असलेल्या कव्हरकडे परत जातो. यानंतर कव्हरवर पाय ठेवताच लगेचच हे झाकण पलटतं आणि थियो खोल नाल्यात कोसळतो (Boy Fell in Deep Drain). यानंतर महिला काहीही विचार न करता आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी 20 फूट खोल नाल्यावरील लोखंडाचं झाकण काढून त्यात उडी घेते. सुदैवाने हा चिमुकला जास्त आत गेलेला नसतो आणि अगदी वेळेत ही महिला मुलाला वरती खेचून घेते. सुदैवाने यात या मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या घटनेनंतर मुलाची आई सदम्यात गेली. महिलेनं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेबद्दल माहिती दिली. बिबट्याने माकडिणीला जबड्यात पकडलं, तरी मृत आईला बिलगूनच राहिलं पिल्लू; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मला नव्हतं माहिती की मी असं काही करणार आहे. माझा मुलगा अडचणीत असताना त्याला वाचवण्यात मी यशस्वी ठरले.' हा भयानक क्षण आठवत तिने स्काय न्यूजसोबत बोलताना सांगितलं की 'माझ्या डोक्यात पहिला विचार आला, की त्याला काहीतरी झालं आहे आणि त्याचा जीव जाईल. यानंतर मी लगेचच नाल्याचं झाकण बाजूला केलं आणि आत डोकावलं तेव्हा तो मला हाक देत होता. त्याच्या गुडघ्यापर्यंत सांडपाणी होतं. हे पाहताच मी नाल्यात उडी घेतली. मात्र नाल्याच्या वरती असलेल्या जागेचा आकार इतका मोठा नव्हता की मी खाली वाकून त्याला उचलून घेऊ शकेल. त्याला वरती खेचण्यासाठी आणि तिथून बाहेर काढण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली, असंही तिने सांगितलं. '
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Mother, Shocking video viral

    पुढील बातम्या