मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - खेळता खेळता पाण्यात बुडाला चिमुकला, ओरडूही शकला नाही; पण पुढच्याच क्षणी झाला चमत्कार

VIDEO - खेळता खेळता पाण्यात बुडाला चिमुकला, ओरडूही शकला नाही; पण पुढच्याच क्षणी झाला चमत्कार

नीट बोलता आणि पोहोता न येणारा हा मुलगा स्विमिंग पूलच्या पाण्यात पडला. त्यानंतर पुढे जे घडलं ते कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

नीट बोलता आणि पोहोता न येणारा हा मुलगा स्विमिंग पूलच्या पाण्यात पडला. त्यानंतर पुढे जे घडलं ते कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

नीट बोलता आणि पोहोता न येणारा हा मुलगा स्विमिंग पूलच्या पाण्यात पडला. त्यानंतर पुढे जे घडलं ते कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 01 जून : बऱ्याचदा अशा काही घटना घडतात ज्या कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नसतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक चिमुकला ज्याला नीट बोलता येत नव्हतं आणि पोहोताही येत नव्हतं तो पाण्यात पडला. पाण्यात हा चिमुकला बुडाला जीव वाचवण्यासाठी त्याला ओरडताही आलं नाही (Child drowning in swimming pool). पण त्यानंतर पुढे जे घडलं त्याला चमत्कारच म्हणावा लागेल. खेळता खेळता मुलांसोबत कधी, कुठे, कोणती दुर्घटना होईल सांगू शकत नाही. अशीच दुर्घटना 4 वर्षांच्या चिमुकल्यासोबत झाली. आपल्या छोट्या पावलांनी पळत तो स्विमिंग पूलच्या दिशेने गेला. पाणी दिसल्याने तो उत्साही झाला पण त्याला पोहोता येत नव्हतं. धावत येत त्याने थेट स्विमिंग पूलमध्ये उडी घेतली. त्यानंतर तो पाण्यात बुडालाच. ना त्याला आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करता आली आणि ओरडता आलं. काही क्षणातच हसता-खेळता दिसणारा हा मुलगा आपल्या डोळ्यांसमोरून गायब होतो तेव्हा धडकीच भरते. हे वाचा - VIDEO - ड्रायव्हरसकट बुडत होती कार; बचावासाठी व्यक्तीने पाण्यात उडी मारली अखेर...; असा झाला शेवट चिमुकल्याच्या आसपास कुणीच दिसत नाही आहे. त्यामुळे तो पाण्यात पडला याची कुणालाच माहिती नाही. पण नशीबाने तिथं जवळच असलेल्या एका अपार्टमेंटमधील 12 वर्षांच्या मुलाने या मुलाला बुडताना पाहिलं. त्याने आपल्या वडिलांना याबाबत सांगितलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्विमिंग पूलच्या दिशेने धाव घेतली. बंद गेट ओलांडून येत त्यांनी पाण्यात उडी मारली आणि त्या चिमुकल्याला बाहेर काढलं. चिमुकल्याच्या शरीराची हालचालच होत नव्हती. त्याच्या शरीरात पाणी गेलं होतं, तो बेशुद्ध झाला होता.
ही व्यक्ती मुलाला जमिनीवर झोपवून त्याच्या पोटावर दाब काढत पाणी काढताना दिसते आहे. त्यानंतर कुठे थोड्या वेळाने हा मुलगा शुद्धीवर आल्याचं दिसतं. हे वाचा - बापरे! खेळता खेळता चिमुकलीने मानेभोवती गुंडाळला जिवंत साप; अंगावर काटा आणणारा VIDEO इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्या आहे. पोस्टमध्ये दिलेल्य माहितीनुसार ही घटना अमेरिकेच्या कॅनससमध्ये झाल्याची माहिती मिळते आहे. देवदूतासारखी ही व्यक्ती चिमुकल्यासाठी धावून आली. या व्यक्तीचं आणि त्याच्या मुलाचं कौतुक केलं जातं आहे. त्यांना सुपरहिरो म्हटलं जात आहे.
First published:

Tags: Small child, Viral, Viral videos

पुढील बातम्या