संतापलेला हत्ती माणसांवर हल्ला करत विहिरीवर पोहोचला आणि...

संतापलेला हत्ती माणसांवर हल्ला करत विहिरीवर पोहोचला आणि...

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता संतापलेला हत्ती काही लोकांचा मागे लागून त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला करत आहे.

  • Share this:

मुंबई, 04 डिसेंबर: आतापर्यंत अनेक वेळा हत्तीचे मस्ती करताना किंवा चिडलेल्या हत्तीचे हल्ला करतानाचे व्हिडीओ पाहिले असतील. पण काहीतरी पाहून हत्ती घाबरला आहे किंवा शांत झाला असे व्हिडीओ अत्यंत दुर्मीळपणे पाहायला मिळतात. छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता संतापलेला हत्ती काही लोकांचा मागे लागून त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला करत आहे. हा हत्ती हल्ला करण्यासाठी जंगलाकडून पळत येतो आणि त्याची नजर अचानक भल्यामोठ्या विहिरीकडे जाते. दोन सेकंद हा हत्ती थबकतो आणि जंगलाच्या दिशेनं वळून निघून जातो.

हत्तीचा हा व्हिडिओ जशपूर जिल्ह्यातील कुंकुरीला लागून जामचुआ मिशन बागानचा असल्याचं सांगितलं जात आहे. पहाटेच्या सुमारास आलेल्या हत्तीला लोकांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला मात्र संतापलेल्या हत्तीनं त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. अचानक या हत्तीसमोर मोठी विहिर आली आणि त्यामुळे हत्ती दोन सेकंद जागीच थांबला.

हे वाचा-या LIC च्या योजनेत करा गुंतवणूक, एकदाच हप्ता भरल्यानंतर दरमहा मिळतील 14000

त्यावेळी शेताच्या दिशेनं जात असताना हत्तीला भलीमोठी विहीर दिसली. ही विहीर पाहून हत्ती थांबला आणि तो मागे फिरून पळून गेला. त्याला काय वाटलं असाव याचा अंदाज कुणाला आला नाही मात्र त्याला ती विहीर ओलांडता न आल्यानं तो जंगलाच्या दिशेनं चालता झाला. नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती वनविभागाला देण्यात आली. विभागाच्या अधिका्यांनी लोकांना हत्तींबद्दल जागरुक राहण्यास सांगितले आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 4, 2020, 10:22 PM IST

ताज्या बातम्या