Home /News /viral /

भयंकर! वृद्ध व्यक्तीला 20 तास फ्रिजरमध्ये ठेवलं; नेमकं काय घडलं वाचा सविस्तर

भयंकर! वृद्ध व्यक्तीला 20 तास फ्रिजरमध्ये ठेवलं; नेमकं काय घडलं वाचा सविस्तर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृद्ध व्यक्ती बालसुब्रमण्यम होते. ते बेशुद्ध झाले होते.

    चेन्नई, 15 ऑक्टोबर : वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असं समजून नातेवाईकांनी त्या व्यक्तीला फ्रिजरमध्येमध्ये बंद केलं. बाकी नातेवाईक येईपर्यंत या वृद्धाचा मृतदेह नीट राहावा यासाठी त्यांनी या व्यक्तीला फ्रिजरमध्ये बंद करून ठेवलं. पण हैराण करणारी गोष्ट तर पुढे घडली. 20 तास फ्रिजरमध्ये राहून देखील हा वृद्ध व्यक्ती जिवंत होता. डॉक्टरही हे पाहून चकीत झाले सध्या या वृद्धावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही धक्कादायक घटना तमिळनाडूची राजधानी चेन्नईमधून समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चेन्नईच्या कदमपट्टीमध्ये हा प्रकार घडला. बालसुब्रमण्य कुमार त्यांच्या लहान भावासोबत राहात होते. सोमवारी धाकटा भाऊ श्रवण यांनी फ्रिजर बॉक्स मागवला आणि दोन दिवसांनी काम संपल्यावर हा बॉक्स परत घेऊन जाण्यासाठी येईनं असं डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यानं सांगितलं. जेव्हा कर्मचारी हा बॉक्स घ्यायला आला तेव्हा त्याला बॉक्समध्ये हालचाल होत असल्याचा आवाज आला. हे वाचा-कसं शक्य आहे? ड्रायव्हरशिवाय चालतेय गाडी, विश्वास बसत नसेल तर पाहा हा VIDEO या कर्मचाऱ्यानं बॉक्स उघडल्यावर त्याला मोठा धक्का बसला आता असणारा वृद्ध व्यक्ती हा जिवंत होता. दोन मिनिटासाठी या कर्मचाऱ्याच्या पायतले त्राण नाहीसे झाले. काय प्रकार समजेना त्याने तातडीनं या वृद्धाला बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरही हा संपूर्ण प्रकार ऐकून थक्क झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृद्ध व्यक्ती बालसुब्रमण्यम होते. ते बेशुद्ध झाले होते. त्यावेळी ते गेले असं त्यांच्या धाकट्या भावाला वाटलं त्यामुळे त्यानं तातडीनं फ्रिजर बॉक्स त्यांना ठेवण्यासाठी मागवला. इतर नातेवाईक येईपर्यंत त्यांचा मृतदेह सुरक्षित राहावा यासाठी तो बॉक्स मागवण्यात आला होता. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धाकटा भाऊ श्रवणची मानसिक स्थिती ठिक नसल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगितलं यासोबतच पुढील तपास सुरू असून बालसुब्रमण्यम यांच्यावर उपचार सुरू आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या