मराठी बातम्या /बातम्या /Viral /चिकन सूप प्यायल्यानंतर महिलेचा पोटात झाला स्फोट आणि...

चिकन सूप प्यायल्यानंतर महिलेचा पोटात झाला स्फोट आणि...

अमांडानं दिलेल्या माहितीनुसार रेस्टॉरंटमध्ये शेफनं दिलेल्या औषधानंतर पोटात आणि घशात खूप जळजळ व्हायला लागली

अमांडानं दिलेल्या माहितीनुसार रेस्टॉरंटमध्ये शेफनं दिलेल्या औषधानंतर पोटात आणि घशात खूप जळजळ व्हायला लागली

अमांडानं दिलेल्या माहितीनुसार रेस्टॉरंटमध्ये शेफनं दिलेल्या औषधानंतर पोटात आणि घशात खूप जळजळ व्हायला लागली

मुंबई, 07 ऑगस्ट : एका हॉटेलमध्ये चिकन सूप प्यायल्यानंतर पोटात स्फोट झाल्यानं मोठी खळबळ उडाली. बऱ्याचदा आपण गडबडीत काय करतो याचं भान आपल्याला राहात नाही आणि मग त्याचा परिणाम मोठा होतो. कधीकधी हा परिणाम जीवघेणाही ठरू शकतो याची कल्पना त्यावेळी आपल्याला नसते. असाच भयंकर प्रकार एका रेस्टॉरंटमध्ये घडला.

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत ही घटना घडली. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या महिलेनं ऑर्डर दिली आणि त्यानंतर तिला अचानक उचकी लागायला सुरुवात झाली. काही केल्या ही उचकी थांबण्याचं नाव घेत नव्हती. पाणी, साखर, श्वास रोखणं सगळे प्रयत्न करून संपले पण उचकी काही केल्या थांबेना.

हे वाचा-VIDEO : बिबट्याच्या जबड्यातून मुलाला वाचवण्यासाठी आईनं केलं जीवाचं रान

ही उचकी थांबावी म्हणून तिथल्या शेफन रेमेडीच्या नावाखाली व्हिनेगर ऐवजी गडबडीत चुकून ओव्हन क्लीनर दिलं आणि घात झाला. त्यानंतर महिलेनं आलेली ऑर्डर खायला सुरुवात केली. चिकन सूप घेता क्षणी पोटात स्फोट झाला. ही घटना 2013 मध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या सात वर्षांपासून या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेफची एक चूक महिलेसाठी वेदनादायी आणि जीवघेणी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमांडा नावाच्या या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. या महिलेला पूर्वीसारखं आयुष्य जगता येणार नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली. या महिलेनं आपलं दु:ख जगासमोर आणलं आहे.

हे वाचा-'ट्रम्पच माझे अब्बू', धक्कादायक खुलासा करणाऱ्या पाकिस्तानी तरुणीची VIDEO VIRAL

अमांडानं दिलेल्या माहितीनुसार रेस्टॉरंटमध्ये शेफनं दिलेल्या औषधानंतर पोटात आणि घशात खूप जळजळ व्हायला लागली आणि त्यानंतर अमांडा खाली कोसळली. त्यावेळी तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तेव्हा व्हिनेगार ऐवजी पोटात अॅसिड गेल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं. या महिलेनं सेस्टॉरंटकडे 36 कोटी 25 हजारांची नुकसान भरपाई देण्यासाठी दावा केला आहे. सुरुवातीच्या काळात अनेक शस्रक्रिया झाल्या. रोज तीन इंजेक्शनवर ही महिला सध्या जिवंत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.ही घटना घडल्यानंतर या प्रकरणी कठोर कारवाई झाली नाही ना रेस्टॉरंट बंद झालं. आता ते रेस्टॉरंट नाव बदलून सुरू असल्याचा आरोपही या महिलेनं केला आहे.

First published:

Tags: Photo viral