VIDEO : आई पाहा मी शिकार केली! चित्त्यानं पकडली हरणाची मान आणि...

VIDEO : आई पाहा मी शिकार केली! चित्त्यानं पकडली हरणाची मान आणि...

जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या हरणाची चित्त्यानं पकडली मान, पाहा शिकारीचा LIVE VIDEO

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : सोशल मीडियावर शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण हा लाईव्ह थरार पर्यटकांना अगदीच दुर्मीळ पाहायला मिळतो. त्यात रस्त्यावरून जाणाऱ्या हरणाची वाट अडवून त्याला पकडून दमवून केलेल्या शिकारीचा व्हिडीओ पाहाणं हे देखील दुर्मीळ असतं. सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती या चित्त्यानं केलेल्या शिकारीची.

सावज अडवून त्याला पंजाखाली दाबून दमवून त्याची शिकार करणं हे चित्त्याचं वैशिष्ट्यं पण सावज हातातून सुटणार नाही याची देखील तो कटाक्षानं काळजी घेत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हरीण आपला जीव वाचवण्यासाठी खूप धडपड करतं. चित्त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी एक दोन नाही तर अनेकवेळा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसेल.

हे वाचा-बोर्डाचा रिझल्ट हॉटेलमध्ये! सर्वात Viral मेन्यूकार्ड

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हरीण धडपड करत असतं. मात्र तो पळून जाऊ नये म्हणून चित्ता आपल्या दोन पंजांनी त्याला पकडून ठेवतं. बराचवेळ हा खेळ सुरू राहातो.

IFS अधिकारी गौरव शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे चित्याचं पिल्लू असून ते आई येईल याची वाट पाहात हरणाला खेळवत ठेवतं. आपण केलेली शिकार आईला दाखवण्यासाठी हा खटाटोप सुरू असतो. अखेर हा खेळ संपतो आणि आई येताच चित्याचं पिल्लू हरणाची मान पकडून त्याला फरफटत आईपाशी घेऊन जातं आणि केलेली शिकार दाखवतं. हा व्हिडीओ आतापर्यंत 22 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 18, 2020, 4:13 PM IST

ताज्या बातम्या