Chain Snatching ला विरोध करणाऱ्या महिलेवर चोराचा चाकूनं हल्ला, घटनेचा VIDEO आला समोर

Chain Snatching ला विरोध करणाऱ्या महिलेवर चोराचा चाकूनं हल्ला, घटनेचा VIDEO आला समोर

एका चोरानं चेन स्नॅचिंगदरम्यान महिलेवर चाकूनं हल्ला केला. या घटनेत महिलाचा मृत्यू झाला आहे. चोरी आणि हत्येची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : देशात मागील काही काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. विशेषतः चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या (Chain Snatching) घटनांमध्ये अधिक वाढ नोंदवली गेली आहे. नुकतंच समोर आलेल्या एका प्रकरणात तर महिलेला चेन स्नॅचिंगचा विरोध करण्याची किंमत आपला जीव गमावून द्यावी लागली आहे. एका चोरानं चेन स्नॅचिंगदरम्यान महिलेवर चाकूनं हल्ला केला. या घटनेत महिलाचा मृत्यू झाला आहे. चोरी आणि हत्येची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. महिलेवर हल्ला झाला यावेळी तिच्यासोबत दोन वर्षांचा एक लहान मुलगादेखील होता.

हे प्रकरण राजधानी दिल्लीतील आहे. इथे आदर्श नगरमध्ये 25 वर्षीय सिमरन कौर काहीतरी कामानिमित्त घराबाहेर पडली होती. त्यांच्यासोबत एक दोन वर्षाचा मुलगा आणि एक महिलादेखील होती. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या घटनेनुसार, या दोन्ही महिला रस्त्यानं जात असतानाच मागून एक चोर आला आणि त्यानं सिमरन कौर यांच्या गळ्यातील चेन ओढण्याचा प्रयत्न केला. सिमरननं त्याला विरोध करताच चोर रस्त्यावर पडला आणि अचानक उठून त्यानं सिमरनवर चाकूनं वार केला. दोन्हीही वार गळ्यावर झाल्यानं घटनेत सिमरन यांना गंभीर दुखापत झाली.

स्थानिकांनी तात्काळ सिमरन यांनी जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं. मात्र, काहीच वेळात सिमरन यांचा मृत्यू झाला. आदर्श नगर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली असून तपासही सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आसपासच्या परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेजही पोलीस तपासत आहेत. सोबतच परिसरातील सक्रीय चोरांचे रेकॉर्डही तपासले जात आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: February 28, 2021, 10:47 AM IST

ताज्या बातम्या