मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चार कानांची मांजर होतेय व्हायरल, साजरा करतेय नव्या घराचा आनंद

चार कानांची मांजर होतेय व्हायरल, साजरा करतेय नव्या घराचा आनंद

चार कान असलेली मांजर (Cat with four ears getting famous and viral on social media) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

चार कान असलेली मांजर (Cat with four ears getting famous and viral on social media) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

चार कान असलेली मांजर (Cat with four ears getting famous and viral on social media) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news
इस्तंबूल, 16 नोव्हेंबर: चार कान असलेली मांजर (Cat with four ears getting famous and viral on social media) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला तर निसर्गानं इतरांपेक्षा वेगळं घडवलं असेल, तर तो नेहमीच (Point of attraction) सर्वसामान्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. काही वर्षांपूर्वी जेव्हा अभिनेता हृतिक रोशनचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला होता, त्यावेळी त्याच्या अभिनयासोबत त्याच्या हाताला असणाऱ्या सहाव्या बोटाची चर्चा जोरदार रंगली होती. त्याचप्रमाणं दोन तोंडांचा साप, दोन तोंडांचं कासव किंवा चीनमधील चार हात असलेला मुलगा असे विषय सर्वसामान्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या चर्चा मांजरीची काही दिवसांपूर्वीच रशियात एका मांजराचा जन्म झाला आहे. या मांजरीला चार कान आहेत. नेहमीसारखे दोन कान आणि त्याच्या पुढे त्याला लागूनच असलेले दोन कान. या मांजरीचं नाव आहे मिडास. या मांजरीच्या नावे स्वतंत्र इन्टाग्राम पेजदेखील आहे आणि त्याचे 46 हजार फॉलोअर्सदेखील आहेत. चार कानांसोबत या मांजरीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. तिच्या छातीवर एक हृदयाच्या आकाराची जन्मखूणदेखील आहे. हे वाचा- हे Dream आहे की Job? 14 दिवसांची नोकरी, 9 लाख रुपये पगार! मांजर गेली टर्कीला रशियातून ही मांजर आता टर्कीला राहायला गेली आहे. कैनिस डोसेमेसी नावाच्या महिलेनं मिडासला दत्तक घेतलं असून तिचा सांभाळ सुरु केला आहे. कैनिसकडे एक कुत्रादेखील आहे. सध्या कुत्र्यासोबत मिडासचं चांगलंच गुठपीठ जमलं आहे. दोघं एकमेकांशी खेळत असल्याचे फोटो सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या प्राण्यांचा सांभाळ करणं आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक आवडनिवडीनुसार राहू देणं, हेच सर्वात महत्त्वाचं असल्याचं कैनिस सांगतात. सध्या या मिडास मांजरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
First published:

Tags: Cat, Pet animal, Photo viral

पुढील बातम्या