Home /News /viral /

टीव्हीतील चिमणीची शिकार करणाऱ्या मांजराचा झाला पोपट; मजेदार VIDEO व्हायरल

टीव्हीतील चिमणीची शिकार करणाऱ्या मांजराचा झाला पोपट; मजेदार VIDEO व्हायरल

Viral Video:विविध करमतींमुळे मांजरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

  नवी दिल्ली, 07 जुलै: सोशल मीडियावर (Social media) मांजरांची (Cat) खूप जास्त क्रेझ आहे. विविध करमतींमुळे मांजरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतं असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक मांजर आरामात बसून टीव्ही (Tv) पाहताना दिसत आहे. पण टीव्ही सुरू असतानाच मांजराची नजर टीव्हीतील चिमणीवर पडली. तिची शिकार करण्यासाठी मांजरानं चिमणीवर झडप मारली. योग्य वेळी झडप मारूनही बिचाऱ्या मांजराच्या हाती, काहीचं लागलं नाही. मांजरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. भारतात मांजरीचे खूप लाड केले जातत. अनेक कुटुंबं मांजराला आपल्या घरातील सदस्य मानतात. अगदी आंघोळीपासून मांजरीला स्वतःच्या हातानं घास भरवणे, इथपर्यंत मांजरीचे लाड पुरवले जातात. असाच हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये घरातील एका सदस्यानं चक्क मांजराला टीव्ही लावून दिली आहे. पण मांजरानं गप्प गुमानं टीव्ही पाहायचं सोडून टीव्हीतील चिमणीवर डाव साधण्याचा प्रयत्न करत आहे.
  तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता, एक मांजर एखाद्या माणसांप्रमाणे आरामात बसून घरात टीव्ही पाहाण्याचा आनंद लुटत आहे. दरम्यान मांजरीला टीव्हीवर एक चिमणी दिसली. मांजरीनं दुसऱ्या क्षणात चिमणीची शिकार करण्यासाठी तिच्यावर झेप घेतली. पण मांजरीच्या हाती काहीच नाही आलं. मांजरीनं टीव्हीतील चिमणीवर झडप मारली, पण चिमणी उडून गेली. त्यामुळे मांजराचा पुरता हिरमोड झाला आहे. हेही वाचा-मृतावस्थेतील पक्ष्याला जागं करताना मित्राची धडपड, मन हेलावून टाकणारा VIDEO मांजराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. alqemzi_12345 नावाच्या युजरने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास 58 हजार लाइक्स मिळाल्या आहेत. तर अनेकांनी कमेंट करत भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cat, Viral video.

  पुढील बातम्या