VIDEO : मांजराने असा वाचवला चिमुकल्याचा जीव, हा व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल थक्क

VIDEO : मांजराने असा वाचवला चिमुकल्याचा जीव, हा व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल थक्क

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पुन्हापुन्हा आश्चर्याचा धक्का बसेल. एका मांजराने प्रसंगावधान राखून चिमुकल्याचा जीव वाचवला.

  • Share this:

मुंबई, 9 नोव्हेंबर : हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पुन्हापुन्हा आश्चर्याचा धक्का बसेल. एका मांजराने प्रसंगावधान राखून चिमुकल्याचा जीव वाचवला. कोलंबियामधल्या एका घरातला हा व्हिडिओ आहे. एक वर्षाचं बाळ पाळण्यातून बाहेर पडलं आणि जिन्याच्या दिशेने जाऊ लागलं. त्याच वेळी धोका ओळखून हे मांजर त्याच्या दिशेने झेपावलं आणि त्याने बाळाला वाचवलं.

सॅम्युअल नावाच्या या चिमुकल्याच्या घराला 12 पायऱ्या होत्या. या पायऱ्यांवर तो निसटला तेव्हा तेवढ्यात या मांजराने त्याच्यावर उडी मारली. 31 ऑक्टोबरला घडलेली ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे.

या मांजराने त्याच्या छोट्याशा पंजाने या बाळाला पायऱ्यांवर उतरण्यापासून रोखलं आणि या बाळाने त्याची दिशा बदलली.

घरातला पाळीव कुत्रा, मांजर यांचा घरातल्या सगळ्यांना कसा लळा लागतो आणि हे प्राणी कधीकधी माणसांपेक्षाही मोठा जिव्हाळा दाखवतात हेच या व्हिडिओवरून दिसतं.हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालाय.ही मांजर उत्कृष्ट बेबीसीटर आहे आणि तिला याचं बक्षीस म्हणून भरपूर ट्यूना मासे खायला घालावेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

==========================================================================================

First published: November 9, 2019, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading