Home /News /viral /

विजेच्या खांबावर चढून बसली मांजर, रेस्क्यू करताना लोकांची उडाली तारांबळ, पाहा VIDEO

विजेच्या खांबावर चढून बसली मांजर, रेस्क्यू करताना लोकांची उडाली तारांबळ, पाहा VIDEO

या मांजरीची अवस्था खूप वाईट झाली होती. तिला खाली उतरता येत नव्हतं. अग्निशमन दलानं या मांजरीला सुरक्षितपणे खाली उतरवलं आहे.

    आयरलँड, 17 डिसेंबर : मांजर कधी आणि कुठे चढून बसेल याचा नेम नाही. सतत काही ना काही मांजरीचे चाळे सुरूच असतात. काहीवेळा झाडावर, घरावर चढल्यानंतर मांजराला उतरण्याची भीती वाटते आणि अशावेळी मदतीसाठी आरडाओरडा सुरू होतो. असाच एक प्रकार समोर आला आहे. अशीच एक मांजर अनावधानानं विजेच्या खांबावर जाऊन बसली आणि तिला खाली काही केल्या उतरता येईना. त्यामुळे आता त्या मांजरीसमोर काय करायचं असा गहन प्रश्न निर्माण झाला. स्थानिकांनी या घटनेची माहिती बचावकार्य पथक आणि अग्नशमन दलाला कळवली आणि मांजरीच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी अग्निशमनची टीम दाखल झाली. आयर्लंडच्या लाइमरिक येथे एक मांजर खांबावर चढली. याची माहिती अग्निशन दलाला मिळताच त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेनच्या मदतीने पोहोचून सुखरुप बाहेर काढले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लाइमरिक अ‍ॅनिमल वेलफेअरने जेव्हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला तेव्हा मांजरीची दुर्दशा प्रथम चर्चेत आली. नंतर, त्याने बचावाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल केला आहे. हे वाचा-Shocking Video! अजगराने घातलं वेटोळं, मित्र करत होते सोडवण्याचा प्रयत्न मात्र... या मांजरीची अवस्था खूप वाईट झाली होती. तिला खाली उतरता येत नव्हतं. अग्निशमन दलानं या मांजरीला सुरक्षितपणे खाली उतरवलं आहे. या पोस्टवर अनेकांनी मांजरीला रेस्क्यू केल्यानंतर अग्निशमन दलाचं कौतुक आणि आभार देखील मानले आहेत. अनेकदा मांजरी सहज झाडावर, घरावर, इमारतीवर किंवा उंच ठिकाणी चढतात मात्र उंच ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा त्यांना खाली उतरण्याची भीती वाटते अशा वेळी त्या घाबरतात आणि मदतीसाठी ओरडतात. स्थानिक नागरिकांनी या मांजरीचा आवाज ऐकून अग्निशमन दलाला माहिती दिली आणि मांजर सुखरूप खाली उतरली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या