• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे हे काय! इवल्याशा पोपटाला घाबरून मांजराने ठोकली धूम, पाहा मजेशीर VIDEO

अरे हे काय! इवल्याशा पोपटाला घाबरून मांजराने ठोकली धूम, पाहा मजेशीर VIDEO

तुम्ही सर्वांनी आतापर्यंत सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्राण्यांचे व्हिडिओ (Animal Videos) पाहिले असतील. मात्र, हा व्हिडिओ सर्वात वेगळा आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : तुम्ही कधी एखाद्या पक्षाने मांजरीला (Cat) घाबरवल्याचं पाहिलं आहे का? जर पाहिलं नसेल तर ट्विटरवर शेअर केला गेलेला हा व्हिडिओ नक्की पाहा. हा असा व्हिडिओ आहे, जो तुम्हाला पोट धरून हसण्यास भाग पाडेल. व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन देण्यात आलं, की ' हे काय आहे...?' हा व्हिडिओ अनेकांनी लाईक केला आहे आणि अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ (Funny Video of Cat and Parrot) तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल. बायकोच्या चपलांमुळे तुटली हाडे; पतीनं दाखल केला खटला, वाचा न्यायालयाचा निकाल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की मांजर आपली शेपटी हालवत बसली आहे. तिच्या शेजारीच बसलेला पोपट आपलं तोंड उघडतो आणि आपल्या पायाच्या मदतीनं मांजराचं शेपूट पकडण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ मांजर या पक्षाच्या हालचाली पाहत असतं. अखेर पक्षाला कंटाळून मांजर उडी घेऊन तिथून पळ काढतं. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी या व्हिडिओ कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्राण्यांचे व्हिडिओ (Animal Videos) पाहिले असतील. मात्र, हा व्हिडिओ सर्वात वेगळा आहे. 70 किलोचा केळीचा घड मालकालाच पडला महागात, यामुळे कामगाराला द्यावे लागणार 4 कोटी व्हायरल होणारा हा व्हिडिओ आतापर्यंत 37 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. एका यूजरनं व्हि़डिओवर कमेंट करत लिहिलं, पहिल्यांदाच मी एखाद्या पक्षाने मांजराला घाबरवल्याचं पाहिलंय. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, संकट टळलं. तर आणखी एकानं यावर कमेंट करत लिहिलं, असं कुठे घडतं. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: