व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मोठा उंदीर गादीमधून बाहेर येतो. तो मांजरीकडे बघतो आणि यानंतर मांजर लगेचच तिथून धूम ठोकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर @Jamie24272184 नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. पत्नीनं खरेदी केलेली ती वस्तू पाहून हादरला पती; शॉपिंगवरच घातली बंदी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. अनेकांना हा व्हिडिओ विनोदीही वाटला आहे. याच कारणामुळे अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, इथे तर गंगा उलटीच वाहत आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, याला म्हणतात भीती. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.Oh fuck that. I’m out! pic.twitter.com/8N54xkovoI
— Jamie Gnuman197... (@Jamie24272184) October 17, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cat, Funny video