मराठी बातम्या /बातम्या /Viral /

LIVE रिपोर्टिंगमध्ये आली मांजर आणि खेचायला लागली कोट, पाहा असा महिला रिपोर्टरचा VIDEO

LIVE रिपोर्टिंगमध्ये आली मांजर आणि खेचायला लागली कोट, पाहा असा महिला रिपोर्टरचा VIDEO

LIVE रिपोर्टिंगदरम्यान मांजरीची लुडबुड, हा VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

LIVE रिपोर्टिंगदरम्यान मांजरीची लुडबुड, हा VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

LIVE रिपोर्टिंगदरम्यान मांजरीची लुडबुड, हा VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

    नवी दिल्ली, 20 डिसेंबर : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, मिश्कील तर कधी मनाला चटके लावून जाणारे तर कधी अचानक घडलेल्या प्रसंगातून सावरणारे. पत्रकारांना ऊन-पाऊस-वारा अनेक प्रसंगांना तोंड देत वर्तांकन करावं लागत असतं. काहीवेळा त्यांच्यासोबत देखील मजेशीर प्रकार घडत असतात असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की पत्रकार लाईव्ह वार्तांकन करत असताना खाली बसलेली मांजर खूप त्रास द्यायला सुरू करते. आपल्याला त्रास होतो असं कुठेही चेहऱ्यावर न आणता वर्तांकन सुरू असता. 31 सेकंदाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-धक्कादायक! दुकानदारानं खराब चप्पल दिलं म्हणून पतीनं खेचलं कोर्टात आतापर्यंत हा व्हिडीओ 226 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका युझरनं ही मांजर लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान लुडबुड करत असल्याचं म्हटलं आहे. तर महिला पत्रकारनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना My most loyal follower असं म्हणत मांजरीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी एका पत्रकारनं चक्क गाढवगाडीवर बसून लाईव्ह रिपोर्टिंग केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर एक महिला पत्रकार रिपोर्टिंग करत असताना तिच्या अंगावर तुषारसिंचनाचे पाणी पडल्याचा तर पाकिस्तानात लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान हत्तीनं रिपोर्टरच्या अंगावर पाणी उडवल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या