लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर काही कंपन्यांनी आणखी काही महिने किंवा कायम घरून काम करण्याचा पर्याय निवडला आहे. वर्क फ्रॉम होममुळे काही लोकांन बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. आता तर याला पाळीव प्राणीही अपवाद ठरले नाहीत असंच म्हणावं लागेल. कारण असंच एक शॉकिंग प्रकरण समोर आलं आहे. मालकाच्या वर्क फ्रॉम होममुळे एक मांजर आजारी पडलं आहे (Cat ill due to owner's work from home).
25 वर्षांचा हॅरी जॉन्स ज्याची मांजर त्याच्यासाठी खूप खास आहे. पण हॅरी जेव्हापासून घरून काम करू लागला तेव्हापासून त्याची मांजर विचित्र वागू लागली. एक दिवस तर मांजर रडू लागलं. ती दरवाजावर आपली नखं मारत होती. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याला तिची चिंता वाटू लागली. घाबरलेल्या हॅरीने तिला घेऊन पशूतज्ज्ञांकडे धाव घेतली. प्राण्यांच्या डॉक्टरांनी मांजरीची तपासणी केली, त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते हैराण करणारं होतं. तिच्या आजारपणाचं कारण दुसरंतिसरं काही नाही तर खुद्द हॅरीच होता. तो घरात पूर्ण दिवस असल्याने ती अशी वागत होती.
हे वाचा - Video Game खेळत टॉयलेट सीटवर बसला, खालून सापाने साधला डाव; गुप्तांगात दात घुसले आणि...
डॉक्टर सांगितल्यानुसार, हॅरीची मांजर पूर्णपणे ठिक आहे. तिला कोणताच आजार नाही. पण हॅरीच्या वर्क फ्रॉममुळे ती वैतागली. तिला घरात कमी जागा मिळत असल्याने ती त्रस्त आणि नाराज होती. जेव्हा हॅरी ऑफिसला जायचा तेव्हा घरात तिच्या एकटीचं राज्य असायचं. संपूर्ण घरात ती आपल्या मर्जीने खेळायची, मस्ती करायची, हिंडायची. पण जेव्हापासून हॅरी घरातून काम करू लागला तशी तिला जागा कमी, घर लहान वाटू लागलं. तिचा दिनक्रम बदलला, स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटू लागलं आणि हळूहळू तीसुद्धा बदलू लगली. तिचा स्वभाव बदलला, ती चिडचिड करू लागली. जेव्हा हॅरी ऑफिस आणि घरी असा असेल तेव्ही तिची ही समस्या आपोआप सुटेल.
हे वाचा - बापरे बाप! वृद्ध व्यक्तीला सिंहाने जबड्यात धरून फरफटत नेलं; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य
पशूतज्ज्ञांच्या मते, प्राण्यांमध्ये असा बदला सामान्य आहे. घरात एखादं सामान आणल्यास, घरात बरेच लोक किंवा पार्टीच्या निमित्ताने पाहुणे आल्यासही असं होऊ शकतं. हा बदल कोणत्याही प्रकारे असू शकतो. अशा त्रासामुळे मांजरांन सिस्टिटिस होऊ शकतो. त्यामुळे घरात जास्त वेळ राहणाऱ्या मालकांनी त्यांच्यापासून लपून राहण्याचा प्रयत्न करावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cat, Health, Lifestyle, Pet animal, Work from home