Home /News /viral /

मांजरीने पहिल्यांदाच चाखलं थंडगार आइस्क्रिम; कसं झालं तिचं तोंड पाहा VIDEO

मांजरीने पहिल्यांदाच चाखलं थंडगार आइस्क्रिम; कसं झालं तिचं तोंड पाहा VIDEO

मांजर आइस्क्रिम (cat eat icecream) खातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) झाला आहे.

    मुंबई, 11 जून : पहिल्यांदाच आइस्क्रिम (ice-cream) तोंडात घेणाऱ्या एखाद्या चिमुकल्याला तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. मात्र या मांजरीनं  (cat)आइस्क्रिम खाल्ल्यानंतर ती अशी रिअ‍ॅक्ट झाली की ते पाहून तुमचं हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल (social media viral video) झाला आहे. एका ट्विटर युझरने मांजरीला पहिल्यांदाच आइस्क्रिम भरवतानाचा हा व्हि़डीओ शेअर केला आहे. ही मांजर एका खुर्चीवर बसलेली आहे. तिचा मालक तिला एका चमच्याने आइस्क्रिम भरवतो. थंडगार आइस्क्रिम तोंडात जाताच ही मांजराचं तोंड काहीसं असं झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. असं करून प्राण्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना किती वेदना होत असतील याची कल्पनाही नसेल, अशा प्रतिक्रिया काही जणांनीह दिल्यात. तर काही लोकांनी मांजराच्या या व्हिडीओचा मनमुराद आनंद लुटला आहे.संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा टोळधाड नांगर ओढतेय तर मासळी बिअर पितेय, हा VIRAL VIDEO पाहिलात तर पोट धरून हसाल खरा रसिक! पियानोच्या धून ऐकण्यासाठी जंगलातून आला हत्ती, VIDEO VIRAL
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या