• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ही मांजर आहे की स्पायडरमॅन! भराभर उंच भिंतीवर चढली; हा VIDEO पाहून व्हाल अवाक

ही मांजर आहे की स्पायडरमॅन! भराभर उंच भिंतीवर चढली; हा VIDEO पाहून व्हाल अवाक

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की ही मांजर लेजर लाईटचा पाठलाग करत येते आणि भिंतीवर चढते. जिथे जिथे लेजर लाईट पडेल, तिथे ती धावताना दिसते.

 • Share this:
  नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : इंटरनेटवर तुम्हा सर्वांनाच भरपूर व्हिडिओ पाहायला मिळत असतील. यातील काही व्हिडिओ मजेशीर (Funny Video) असतात तर काही हैराण करणारे. तुम्ही अनेकदा मांजरांना झाडावर चढताना किंवा पळताना आणि भांडताना पाहिलं असेल. मात्र, आता जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात दिसतं की मांजर झाडावर नाही तर घराच्या भिंतीवर (Cat on Wall) चढत आहे. प्लेन भिंतीवर चढणं प्रत्येकाला शक्य नाही. कदाचित तुमच्यातील कोणीही आतापर्यंत मांजरीला अशा पद्धतीनं भिंतीवर चढताना पाहिलं नसेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. सोबतच यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. नवव्या मजल्यावरून उडी घेतली अन् BMW वर कोसळला युवक; अवस्था पाहून सगळेच हादरले हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आहे, दो बकलोल शेखरनं आपल्या पेजवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, वाह काय कला आहे. हा व्हिडिओ इतरही अनेक सोशल मीडिया पेजवर दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की ही मांजर लेजर लाईटचा पाठलाग करत येते आणि भिंतीवर चढते. जिथे जिथे लेजर लाईट पडेल, तिथे ती धावताना दिसते.
  लेजर लाईट थांबताच मांजरही भिंतीवरच थांबते. व्हिडिओ पाहून अंदाज येतो की ही मांजर अनेकदा असं करत असावी. सोबतच मांजरीला असं करताना भरपूर मजा येत आहे, हेदेखील जाणवतं. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 70 किलोचा केळीचा घड मालकालाच पडला महागात, यामुळे कामगाराला द्यावे लागणार 4 कोटी एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, ही मांजर तर स्पायडरमॅन निघाली. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, ही मांजर याबाबतीच प्रो आहे. सगळेच लोक हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ REDDIT वरही शेअर करण्यात आला आहे. जवळपास 14000 लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: