आता मांजरही झाली आत्मनिर्भर! तहान लागली म्हणून काय केलं पाहा VIDEO

आता मांजरही झाली आत्मनिर्भर! तहान लागली म्हणून काय केलं पाहा VIDEO

हा व्हिडीओ 28 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दीड हजारहून अधिक लोकांनी लाईक आणि शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भरचा नारा दिल्यानंतर देशात सर्वजण आत्मनिर्भर होण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत. कोरोनाच्या संकटात एकमेकांच्या मदतीनं पुन्हा सुरळीत सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर अनेक जिद्द आणि ऊर्जा जागवणारे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे ती एका मांजरीची.

यापूर्वी एक माकड पाण्याचा नळ सुरू करून पाणी पिताना आणि पाणी वाचवतानाचा दोन व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता तहान लागलेल्या मांजरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मांजरीनंही आता आत्मनिर्भर होण्याचा निश्चय केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हे वाचा-...आणि 2 किमी गाडीच्या बोनेटवर झोपून आरोपीला पकडलं, पाहा खऱ्या सिंघमचा VIDEO

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता मांजर दोन पायावर उभी राहून एका हातानं घरातील अॅक्वा कुलरचा नळ सुरू करून पाणी पिते आणि नंतर पुन्हा नळ बंद करते. त्यानंतर मिशांना लागलेलं पाणी स्वच्छ करून निघून जाते. या मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ 28 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दीड हजारहून अधिक लोकांनी लाईक आणि शेअर केला आहे. अनेक युझर्सनी या मांजरीला पाहून आपल्या घरातील मांजरीच्या आठवणी पुन्हा कमेंट्समध्ये ताज्या केल्या आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 30, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या