• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आई प्रमाणे लहान मुलांची काळजी घेते ही मांजर, पाहा VIRAL VIDEO 

आई प्रमाणे लहान मुलांची काळजी घेते ही मांजर, पाहा VIRAL VIDEO 

एक लहान मुलगा घरातल्या बाल्कनीजवळ उभा असल्याचं व्हिडीओत दिसतं. त्याच्यापासून काही अंतरावर एक मांजर बसलेलं आहे. हे मांजर त्या लहान मुलाला बाल्कनीच्या रेलिंगपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 जुलै : कुत्रा (Dog), मांजर (Cat), गाय आदी पाळीव प्राणी आणि माणूस यांच्यात एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं असतं. अनेकदा हे पाळीव प्राणी त्यांच्या कृतीतून एखाद्या व्यक्तीविषयी वाटणारं प्रेम, काळजी व्यक्त करीत असतात. कुत्रा हा प्राणी जास्त काळजी घेणारा की मांजर यावरून डॉगलव्हर्स (Dog Lovers) आणि कॅटलव्हर्स यांच्यामध्ये (Cat Lovers) कायम वाद पाहायला मिळतो. कुत्रा हा माणसांचा इमानदार मित्र (Honest Friend) समजला जातो; मात्र मांजरांचे खूप लाड केले तरच ती चांगल्या पद्धतीने व्यक्त होतात, अन्यथा ती आपल्या मालकाकडे दुर्लक्ष करतात असा एक समज आहे. मांजरांविषयी असलेला हा समज दूर करणारा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कॉमेंट्सचा (Comments) अक्षरशः पाऊस पडला असून, युजर्स या विषयावर आपलं मत व्यक्त करताना दिसून येत आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्याकडच्या मांजरांचे फोटोही शेअर केले आहेत. मांजर हा देखील कुत्र्या इतकाच जबाबदार आणि आईप्रमाणे प्रेम करणारा, काळजी घेणारा पाळीव प्राणी आहे, असं एका फेसबुक (Facebook) पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडीओतून आपल्याला दिसतं. एक लहान मुलगा घरातल्या बाल्कनीजवळ उभा असल्याचं व्हिडीओत दिसतं. त्याच्यापासून काही अंतरावर एक मांजर बसलेलं आहे. हे मांजर त्या लहान मुलाला बाल्कनीच्या रेलिंगपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. VIDEO: संसदेत घुसून उंदरानं घातला धुमाकूळ; कामकाज सोडून पळू लागले खासदार हा लहान मुलगा बाल्कनीच्या रेलिंगला पकडू लागला, की मांजर आपल्या पंजाच्या मदतीने त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे. शब्दात भावना व्यक्त करू न शकणारं मांजर जणू काही आपली जबाबदारी म्हणून त्या मुलाला बाल्कनीपासून दूर होण्यास सांगत असल्याचं या व्हिडीओतून दिसतं. हा व्हिडीओ लाखो युजर्सनी पाहिला असून, या व्हिडीओला नेटिझन्सची चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक युजर्स हा व्हिडीओ शेअर (Share) करीत असून, त्यावर कॉमेंट्सचा देखील पाऊस पडत आहे. केवळ कुत्राच नाही, तर मांजर देखील काळजी घेणारा प्राणी आहे, असं काही युजर्सचं म्हणणं आहे. या मांजराला पाहून असं वाटतंय, की घरातली मंडळी त्याची चांगली काळजी घेत असावेत, अशी कॉमेंट एका युजरने केली आहे. मांजर हादेखील समजूतदार प्राणी असतो, असं काही युजर्सनं म्हटलं आहे. 'मी एक कुत्रा पाळला होता. परंतु, हा व्हिडीओ बघता आता मांजर पाळणार आहे,' असं एका युजरने म्हटलं आहे. अनेक युजर्सनी त्यांच्या पाळलेल्या मांजरांचे फोटो कमेंट बॉक्समध्ये शेअर केले आहेत.
  First published: