Home /News /viral /

मांजराच्या वाढदिवसाचा TikTok मराठी VIDEO तुफान व्हायरल; फ्रिलचा फ्रॉक घातलेल्या मांजरीला केलं जातंय औक्षण

मांजराच्या वाढदिवसाचा TikTok मराठी VIDEO तुफान व्हायरल; फ्रिलचा फ्रॉक घातलेल्या मांजरीला केलं जातंय औक्षण

फ्रिलचा फ्रॉक घातलेल्या मांजरीला मराठमोळ्या गाण्याच्या पार्श्वभूमीवर चक्क औक्षण केलं जातंय. TikTok वरची ही लाडाची माऊ पाहाच..

    मुंबई, 22 जानेवारी : सोशल मीडियावर सध्या एक TikTok व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका गोड गोंडस मांजराचा हा व्हिडीओ आहे. या मांजराच्या मालकीण बाईंकडून त्याचा वाढदिवस साजरा होत आहे आणि त्याचाच हा व्हिडीओ आहे. मराठमोळ्या गाण्याच्या पार्श्वभूमीवर मांजराला चक्क औक्षण केलं जातंय.  अगदी पोटच्या मुलाचा किंवा आपल्या कोणत्याही प्रिय व्यक्तीचा ज्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो अगदी तसाच या मांजराचा वाढदिवस या कुटुंबात मोठ्या उत्साहात साजरा होताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. औक्षण करून साजरा झाला मॅवचा बर्थडे सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मार्जार प्रेमींना आनंद देत आहे. खरंतर मांजर हा पाळीव प्राणी अनेकांच्या घरी असतो. काहीजण आपल्या मांजरांचं किती कोडकौतुक करतात किंवा आपल्या घरातला पाळीव प्राणी हा कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच किती महत्वाचा आहे हे या व्हिडीओत बघायला मिळतं. घरातली मंडळी छान तयार झाली आहेत. घर देखील मस्त सजवण्यात आलंय आणि घरातला हा गोड सदस्य जो रंगाने पांढऱ्या शुभ्र केसांचा आहे, गोंडस आहे त्यालाही खास कपडे घालण्यात आले आहेत. पांढऱ्या रंगाचं हे मांजर त्याला शिवलेल्या विशिष्ट कपड्यांमुळे आणखीनच गोड दिसत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत वाढदिवसाला औक्षण करण्याची परंपरा आहे. कपाळाला टिळा लावून आरतीने ओवाळलं जातं आणि तोंड गोड केलं जातं. अगदी या परंपरेप्रमाणे कुटुंबातल्या या खास सदस्याचा बर्थडे साजरा करण्यात आला. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला खारी-बिस्कीट या मराठी चित्रपटातलं गाणं लावण्यात आलंय. व्हिडीओला प्राणी प्रेमींची पसंती देखण्या मांजराचा हा टिकटॉक व्हिडीओ मांजर प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत असून आत्तापर्यंत 14 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. प्राणी प्रेमींकडून आपल्या घरातील मुक्या जीवांची काळजी तर घेतली जातेच पण अशा पद्धतीची खास वागणूक देऊन त्यांचं कुटुंबातलं महत्त्व आणखी वाढवलं जातं. -------------------------- अन्य बातम्या VIDEO डोंगरावरून वाहतोय आगीचा धबधबा! काय आहे VIRAL VIDEO मागचं वास्तव? एका लग्नाची गोष्ट! फोटोमागची कहाणी वाचून तुम्हालाही भारतीय असल्याचा वाटेल अभिमान मृत्यूच्या 7 वर्षानंतर या स्टारच्या गाड्यांचा लिलाव, किंमत ऐकून व्हाल थक्क आईला सोबत घेऊन मुलगी हनीमूनला गेली, पतीचा सासूवर जडला जीव अन् लग्नच उरकून टाकलं
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Tiktok viral video

    पुढील बातम्या