Home /News /viral /

अग्निशमन केंद्राची रखवाली करण्यासाठी प्राणी, मांजरीच्या नोकरीची अजब कहाणी

अग्निशमन केंद्राची रखवाली करण्यासाठी प्राणी, मांजरीच्या नोकरीची अजब कहाणी

हवामान कितीही प्रतिकूल असले तरीही ते आपल्या कर्तव्यात चुकत नाही. हे मांजर आता या अग्निशमन केंद्राचा अविभाज्य घटक झाले आहे.

    बिजींग, 04 डिसेंबर: प्राण्यांना जीव लावला की ते ही आपल्याला जीव लावतात. इमानेइतबारे आपल्यासोबत राहतात. प्राण्यांच्या निष्ठेची, प्रेमाची अनेक उदाहरणे आपण ऐकत असतो. सध्या चीनमध्ये अशाच एका मांजराची चर्चा आहे. हे मांजर चक्क अग्निशमन दलात तिथल्या गार्डसच्या बरोबरीने राखणदाराचे काम नित्यनेमाने पार पाडते. चीनमधील (China) ग्युआंग शहरातील एका अग्निशमन केंद्रातील (Fire Fighting Station) हे मांजर दररोज तिथल्या गार्डसबरोबर राहून बरॅक्सच्या रखवालीचे काम करते. थंडी असो, पाऊस असो, हवामान कितीही प्रतिकूल असले तरीही ते आपल्या कर्तव्यात चुकत नाही. हे मांजर आता या अग्निशमन केंद्राचा अविभाज्य घटक झाले आहे. या केंद्रातील एक कर्मचारी सून होअॅक्सिंग यांनी या मांजराचा एक व्हिडिओ बनवला असून, तो सर्वत्र व्हायरल झाला आहे. लोकांनी आश्चर्य व्यक्त करत, या मांजराचे मनापासून कौतुक केले आहे. सून होअॅक्सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्युआंग शहरातील गायझुहोऊ भागात (Guizhou Province) हे अग्निशमन केंद्र असून, तीन वर्षांपूर्वी चुकून एक मांजराचे छोटेसे पिल्लू या केंद्रात आले. तेव्हा ते अगदी अशक्त होते. तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला जवळ घेतले, त्याला खायला-प्यायला घातले. त्याची काळजी घेतली. हळूहळू त्याची तब्ब्येत सुधारली. हे मांजर या केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाच्या परिचयाचे झाले. सुरुवातीला ते माणसांना घाबरायचे. जवळ जायचे नाही. हळूहळू त्याची भीती गेली आणि निळ्या युनिफॉर्ममधील प्रत्येकाशी त्याची दोस्ती झाली. इथल्या कर्मचाऱ्यांनाही मांजराचा लळा लागला असून, त्यांनी त्याच्यासाठी एक बेडसुद्धा तयार केला आहे. हे वाचा-वर्दळीच्या रस्त्यावर कुत्र्याने गाडी 'ड्राईव्ह' करून थांबवलं ट्रॅफिक; पाहा VIDEO या मांजराचे नाव लान माओ म्हणजेच ब्ल्यू कॅट (Lan Mao)ठेवण्यात आले आहे. सगळेजण त्याच्याशी खेळायला उत्सुक असतात. इथपर्यंत सगळं साधारणच वाटते. पण या मांजराच्या एका कृतीने त्याला वेगळे ठरवले आहे. हे मांजर या अग्निशमन केंद्रात आल्यानंतर काही दिवसातच इथल्या वातावरणाला सरावले आणि त्याने रोज चक्क गार्डची ड्युटी जिथे असते त्या स्टँडवर जाऊन बसायला सुरुवात केली. जो कोणी ड्युटीवर असेल त्याच्याबरोबर ते थांबते. अगदीच थंडी असेल तर ड्युटी असणाऱ्या गार्डच्या पायाशी झोपते. अन्यथा ते त्या स्टँडबाहेर बसलेले किंवा झोपलेले असते. जराही ते तिथल्या गार्डची साथ सोडत नाही. एकही दिवस त्याच्या या कार्यक्रमात खंड पडत नाही. त्याच्या या कृतीने सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटले. काही दिवसांनंतर ते निघून जाईल, असेही अनेकांना वाटले पण हा समज खोटा ठरवत या मांजराने सगळ्यांचीच मने जिंकली. अशा या आगळ्या वेगळ्या मांजराने अनेकांच्या ह्रदयात घर केले असून, त्याच्याबद्दल आणि त्याला प्रेमाने सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल लोकांनी प्रेम व्यक्त केले आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या