दार उघडून बाहेर येईपर्यंत पुरात वाहून गेली कार, पाहा थरारक VIDEO

लाल रंगाच्या गाडीमध्ये असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी स्थानिक धावून आले.

लाल रंगाच्या गाडीमध्ये असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी स्थानिक धावून आले.

  • Share this:
    मथुरा, 05 सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील मथुरा इथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. पुरात मथुरेतील नसते शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे हाल झाले. या पुरात अनेक गाड्या अडकल्या आणि वाहूनही गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असाच एक प्रकार मथुरेत घडला. पुराचं पाणी वेगानं वाढायला लागलं आणि रस्त्यावरून जाणाऱ्या कारमधील माणूस त्यात अडकला. दोन्ही बाजूनी पाण्यानं वेढलेलं आणि मदतीसाठी कुणाला बोलवणंही मुश्कील होतं. कसा बसा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होता. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. हे वाचा-बाईक वाचवण्यासाठी तरुणं जीव घातला धोक्यात, पुढे काय झालं पाहा VIDEO लाल रंगाच्या गाडीमध्ये असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी स्थानिक धावून आले. त्यांनी कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह खूप वेगात असल्यानं गाडी त्या प्रवासोबत वाहून जात होती. दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातमधील अनेका भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोधपूरमध्ये धुवाधार पावसानं 10 तासांपासून बॅटिंग केल्यामुळे नदी, नाले ओव्हर फ्लो झाले आहेत. अनेक वस्त्या, रस्ते पाण्याखाली गेले असून प्रवाह खूप वाढला आहे. आधी कोरोना आणि आता आलेल्या महापुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: