Home /News /viral /

अचानक रिव्हर्स जाणाऱ्या कारमधून बाहेर पडले मायलेक अन्...; घाटातील भयंकर अपघाताचा VIDEO

अचानक रिव्हर्स जाणाऱ्या कारमधून बाहेर पडले मायलेक अन्...; घाटातील भयंकर अपघाताचा VIDEO

घाटात कार अचानक रिव्हर्स गेली.

    अहमदाबाद, 13 ऑगस्ट :  घाटात (Ghat) गाड्या (Accident in ghat) खूप काळजीपूर्वक चालवाव्या लागतात. नाहीतर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. घाटातील अपघाताच्या अशा बातम्या आपल्या कानावर पडत असतात. सध्या अशाच एका घाटातील (Car accident in ghat) घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये घाटात एक कार अचानक रिव्हर्स गेली (Car going reverse in ghat). गुजरातच्या (Gujrat car accident) डागमधील सापुतारा परिसरातील कार अपघाताचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. एक कार रस्त्याच्या मधोमध उभी होती. अचानक ती रस्त्यावर रिव्हर्स चालू लागली. रस्त्यावर बऱ्याच गाड्यांची रहदारी होती. त्यामुळे रिव्हर्स जाणारी ही कार एका दुसऱ्या कारला धडकली. त्यानंतर ही कार टर्न झाली आणि दुसऱ्या मार्गाने सरळ जाऊ लागली. पण त्यावेळी कारचा दरवाजा अचानक उघडला आणि कारमधून एक महिला आणि एक लहान मुलगा रस्त्याच्या मधोमध पडले. सुदैवाने इतर गाड्यांनी आपला वेग कमी केला होता. काही गाड्या थांबल्या होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही कार रस्त्याच्या एका कडेला जाऊन थांबली. तर रस्त्याच्या मधोमध पडलेले मायलेकही तिथून उठले आणि रस्त्याच्या कडेला गेला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. खतरनाक अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हे वाचा - बापरे! गाडीवरून घसरताच तरुणाची सटकली; रागात दुसऱ्यावर चढवली बाईक; पाहा VIDEO याआधीही घाटात रिव्हर्स जाणाऱ्या एका बसचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) रायसेनमधील ही घटना. सुल्तानगंज घाटातील (Sultanganj ghat) हे दृश्यं आहे. प्रवासी बस घाट चढत होती, त्यावेळी ती अचानक रिव्हर्स गेली. बसचा ऑईल फ्रेशर पाइप फुटला होता. त्यामुळे बस अचानक आपोआप रिव्हर्स जाऊ लागली. त्यानंतर ती पुलाच्या रेलिंगला धडकली आणि रोडवरून खाली गेली. सुदैवाने बस तिथं अडकली आणि मोठी दुर्घटना होता होता टळली. दुर्घटनेत एक प्रवासी जखमी झाला. हे वाचा - स्वतःच्या हाताने भरवणाऱ्या महिलेलाच माशाने पाण्यात खेचलं आणि...; खतरनाक VIDEO बस रिव्हर्स जात असताना तिथं रस्त्यावर काही लोक होते. त्यांनी बस अशी उलटी मागे जाताना पाहताच लगेच धाव घेतली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Car, Gujrat, Shocking viral video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या