VIDEO : फ्लायओव्हरवरून हवेत उडाली कार, भयानक लॅडिंगमध्ये सहा जण जखमी; एकाचा मृत्यू

VIDEO : फ्लायओव्हरवरून हवेत उडाली कार, भयानक लॅडिंगमध्ये सहा जण जखमी; एकाचा मृत्यू

अपघातात वाचला ड्रायव्हर, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ

  • Share this:

हैदराबाद, 23 नोव्हेंबर : सोशल मीडियावर नेहमीच खतरनाक अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र नुकताच सोशल मीडियावर एका भयानक फ्लायिंग गाडीचा अपघात झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक गाडी चक्क फ्लायओव्हरवरून हवेत उडून थेट रस्त्यावर आदळली. ही घटना हैदराबादच्या गचीबोली येथे घडली. येथे नुकत्याच एका बायोडायवर्सिटी फ्लायओव्हरचे उद्धाटन करण्यात आले होते. याच फ्लायओव्हरवरून एका गाडी हवेत उडत थेट जमीनीवर आदळली.

या अपघातामध्ये फ्लायओव्हरवरून गाडी खाली पडून तब्बल सहा जण जखमी झाले आहेत. तर, एका महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी एक वाजता घडला. जवळच्या सीसीटीव्हीमध्ये हा भयानक व्हिडीओ कैद झाला. या व्हिडीओमध्ये रस्त्यावरून लोक चालत असताना अचानक एक फॉक्सवॅगन जीटीआय कार हवेत उडून रस्त्यावर पडताना दिसत आहे. दरम्यान हवेतून काय खाली येत आहे, हे पाहिल्यानंतर काही लोकांनी लपण्याचाही प्रयत्न केला. मात्र रस्त्याच्या मध्यभागीच कार पडली, यामुळे रस्त्यावरून चालत असणाऱ्या एका महिलेचे मृत्यू झाला आहे. तर या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हिडीओमध्ये ही फ्लायिंग कार दोन गाड्या आणि झाडाला आदळली. वाहनचालकाचा नियंत्रण तुटल्यामुळं फ्लायओव्हरवरून ही गाडी थेट रस्त्यावर आदळली. गाडी खाली पडताना दिसत असल्याचे पाहून लोकांनी पळण्यास सुरुवात केली.

दरम्यान गचीबोली पोलिस स्थानकात याबाबत ही गाडी जोरात धावत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळं वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. या व्हिडीओमध्ये ज्या ठिकाणी गाडी पडली, तेथेच एक महिला रिक्षाची वाट पाहत होती, तेवढ्याच गाडी पडल्यानं या अपघातात या महिलेचा मृत्यू झाला.

द न्यूज मिनिटनं दिलेल्या बातमीनुसार, भीषण अपघात झालेल्या गाडीच्या वाहनचालकाचे नाव मिलन आहे. गाडीला असलेल्या एअरबॅग्समुळे वाहनचालकाचा जीव वाचला. हैदराबादच्या गचीबोली येथे हा फ्लायओव्हर राज्य सरकारच्या वतीनं 69 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता.

Published by: Priyanka Gawde
First published: November 23, 2019, 8:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading