वातावरणाची कमाल; रस्त्यावरच सुरू झालं गाड्यांचं स्केटिंग

वातावरणाची कमाल; रस्त्यावरच सुरू झालं गाड्यांचं स्केटिंग

या गाड्यांचं स्केटिंगच सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत हा व्हिडीओ 9.5 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : वातावरणात बदल झाला की आपल्या वस्तू किंवा सभोवतालच्या गोष्टी देखील बदलायला सुरुवात होते. अगदी हवामानातील बदलापासून ते निर्जीव गोष्टीवर होणाऱ्या परिणामांपर्यंत. असाच वातावरणातील अनोखा बदल पाहायला मिळाला आहे. असाच एक व्हिडीओ आपण पाहू शकता जिथे एकाच रस्त्यावर अनेक दुर्घटना घडताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे अचानक अपघात होत आहेत. कुणाचा गाडीवरचा ताबा सुटतो आहे तर कुणाचा ब्रेक लागत नाही तर कुणीची कारच रस्त्यावरून घसरते आहे. हा व्हिडीओ आपण नीट पाहिला तर बर्फामुळे हा सगळा प्रकार होत असल्याचं आपल्याला जाणवेल. बर्फामुऴे रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचं नियंत्रण सुटून हा अपघात होत आहे. एक गाडी दुसऱ्या गाडीला धडक देत आहे.

या गाड्यांचं स्केटिंगच सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत हा व्हिडीओ 9.5 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ कॅनडाचा असल्याचा काही युझर्सनी दावा देखील केला आहे मात्र नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलं नाही. बर्फामुळे गाड्या घसरत असून एकमेकांवर आदळत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

एका युझरनं तर कोई तो रोक लो अशी कमेंट केली आहे. या व्हिडीओमध्ये नीट पाहिलं तर केवळ कारच नाही तर अवजड वाहान देखील या रस्त्यावरून घसरताना दिसतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाड्यांच्या स्केटिंगला युझर्सनी देखील तुफान लाईक केलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 27, 2020, 11:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या