• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • डोळ्यादेखत चिमुकल्या लेकावरून गेली कार; ओरडत धावत आले बाबा पण...; अंगावर काटा आणणारा VIDEO

डोळ्यादेखत चिमुकल्या लेकावरून गेली कार; ओरडत धावत आले बाबा पण...; अंगावर काटा आणणारा VIDEO

मुलाला कारने उडवलं पुढे जे घडलं ते शॉकिंग होतं.

 • Share this:
  मुंबई, 19 ऑक्टोबर : आपल्या डोळ्यादेखत आपल्या प्रिय व्यक्तीला काही होणं यापेक्षा वेदनादायी प्रसंग दुसरा कोणताच नाही. आई-बापासमोरच त्यांच्या मुलाचं काही बरं-वाईट होणं हा धक्का ते सहनही करू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात बापाच्या डोळ्यादेखत चिमुकल्या लेकाच्या अंगावरून गाडी गेली (Accident Video). बाबा लेकाकडे धावला पण पुढे जे घडलं ते शॉकिंग होतं (Accident Viral Video). एका लहान मुलासोबत घडलेल्या दुर्घटनेचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसले. व्हिडीओत एक मुलगा रस्त्याशेजारी खेळतो आहे. त्याचे वडीलही तिथंच जवळ आहेत. मुलाच्या बाजूला एका गाडी पार्क केलेली आहे. गाडीचा मालक तिथं येतो. गाडीत तो सामान ठेवतो. त्यावेळी चिमुकला गाडीच्या खाली बसलेला असतो. त्याने त्या मुलाला पाहिलं की नाही माहिती नाही पण तो गाडीत जाऊन बसतो आणि गाडी सुरू करतो. लहान मुलगा गाडीसमोर अगदी मधोमध असतो. गाडी त्याला उडवतो आणि तो गाडीखाली जातो. गाडी भरधाव वेगाने तिथून निघून जातो. हे पाहताच मुलाचे वडील ओरडत त्याच्या दिशेने येतात. पण लेकाला सुखरूप पाहताच त्यांच्या जीवात जीव येतो. मुलगा गाडीच्या मधोमध होता. त्यामुळे गाडीच्या चाकं त्याच्या अंगावरू गेली नाही आणि सुदैवाने तो बचावला. गाडी गेल्यानंतर तो स्वतःच उठून उभा राहिला. हे वाचा - अरे बापरे! सिंहांच्या कळपाने कारला घेरलं आणि...; पाहा धडकी भरवणारा VIDEO @67Ironkikin  ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता याला नशीब म्हणा किंवा चमत्कार. देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ना, तसंच इथं घडलं.
  Published by:Priya Lad
  First published: