— Best Videos 🎥🔞 (@CrazyFunnyVidzz) November 25, 2021व्हिडीओत पाहू शकता एक हिरव्या रंगाची कार रस्त्यावर उभी आहे. या कारचा दरवाजा उघडून एक तरुण बाहेर येतो. त्यानंतर तो कारवर हात टेकवायला जातो. जसा तो तरुण कारला स्पर्श करतो, तशीच कार धाडकन कोसळते आणि जमिनीवर आडवी होते. हे कसं काय शक्य आहे, याच उत्तर व्हिडीओच्या शेवटी आहे. हे वाचा - दुर्दैवी! बापाच्या कारखाली चिरडून लेकाचा अंत; हृदय पिळवटून टाकणारा Live video या व्हिडीओत दिसणारी कार खरीखुरी नाही तर एक कार्डबोर्ड कार आहे. म्हणूनच तरुणाच्या हलक्याशा स्पर्शानेसुद्धा ती कार कोसळली. ही कार नकली आहे, याची पोलखोल होताच तरुणाने गुपचूप ती आपल्या हातात घेतली आणि तिथून पळ काढला. काही असलं तरी या क्रिएटिव्हीटीला दाद द्यायला हवी. जोपर्यंत कार जमिनीवर पडत नाही तोपर्यंत ती खरी कार नाही हे समजतच नाही. अगदी खऱ्या गाडीसारखीच त दिसते. हे वाचा - माथेफिरूनं लावली उभ्या कारला आग, 5 मिनिटांत झाला गायब; पाहा VIDEO बेस्ट व्हिडीओज ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Funny video, Viral, Viral videos