अहमदाबाद 20 जानेवारी : वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे व्हिडिओ नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतात. आता असाच एक व्हिडिओ गुजरातमधील वडोदरा येथून समोर आला आहे. ज्यात एक अनियंत्रित कार क्रॉकरी स्टोअरमध्ये घुसली. त्याचं झालं असं की, कार चालवणाऱ्या महिलेनं पार्किंग करताना ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला. यानंतर जे काही घडलं, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बाळासोबत उभे असताना, पार्किंगमधील कार खाली कोसळली... पुढे काय घडलं? पाहा Video
दुकान मालकाने महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वडोदरातील अलकापुरी भागात बुधवारी रात्री ही विचित्र घटना घडली. यात एका महिला ड्रायव्हरची कार थेट क्रॉकरी दुकानात शिरली. कार पार्क करत असताना महिलेने चुकून ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाऊल ठेवले. यामुळे कार जिना चढून शोरूमच्या आत शिरली. ही संपूर्ण घटना क्रॉकरी स्टोअरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गुजरात के वडोदरा में कार चला रही महिला हादसे का शिकार हो गई. कार चलाते समय महिला ने ब्रेक की बजाए एक्सीलेटर पर पैर रख दिया. जिसके कारण स्पीड बढ़ने से कार सीधे क्रॉकरी स्टोर में जा घुसी. pic.twitter.com/0zKf94xwg4
— Narendra Singh (@NarendraNeer007) January 19, 2023
मात्र, या विचित्र अपघातात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. शोरूमचे मालक महेशभाई सिंधानी यांनी महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही महिला क्रॉकरी खरेदी करण्यासाठी दुकानात आली होती, मात्र कारच्या धडकेने शोरूमच्या एका बाजूची संपूर्ण काच फुटली, तर लाखोंच्या क्रॉकरीची नासधूस झाली. काच फुटल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक भयभीत झाले.
Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि...
कार काचेवर आदळल्याचा आवाज ऐकून ते खूपच घाबरले होते, असं शोरूमच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. सुदैवाने महिलेसह शोरूम कर्मचार्यांपैकी कोणालाही दुखापत झाली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.